कंपनीकडून नदी पात्रात संरक्षक भिंतीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:48+5:302021-08-12T04:45:48+5:30

वासिंद : सारमाळ नदीच्या पात्रात जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीने बांधकाम केल्यामुळे पर्यावरणाची हानी हाेणार आहे. याबाबत त्वरित याेग्य ती कारवाई ...

Construction of protective wall in river basin by the company | कंपनीकडून नदी पात्रात संरक्षक भिंतीचे बांधकाम

कंपनीकडून नदी पात्रात संरक्षक भिंतीचे बांधकाम

Next

वासिंद : सारमाळ नदीच्या पात्रात जेएसडब्ल्यू (जिंदाल) कंपनीने बांधकाम केल्यामुळे पर्यावरणाची हानी हाेणार आहे. याबाबत त्वरित याेग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात जेएसडब्ल्यू कंपनीचे वासिंदच्या हद्दीत जेटीएमएस तसेच जेएसडब्ल्यू स्टील व पेण्ट असे दोन प्लांट आहेत. मुंबईच्या दिशेने म्हणजे कंपनीच्या पश्चिमेकडील बाजूला सारमाळ नदीच्या पात्रात या कंपनीने संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक पात्राला धोका संभवतो. त्यामुळे महसूल विभागाने याठिकाणी त्वरित पाहणी करून हे बांधकाम काढून कंपनी व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय पालेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, हे बांधकाम भूमिअभिलेख कार्यालयाच्या मोजणीनुसार नदीपात्र सोडून केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

काेट

सारमाळ नदीच्या पात्रात केलेल्या बांधकामाची त्वरित पाहणी करण्यात येईल. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

- पी.बी. पाटील, तलाठी, वासिंद.

Web Title: Construction of protective wall in river basin by the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.