इंटरनेट बंद असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी, उलगडलं वेगळचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:34 PM2021-09-23T15:34:17+5:302021-09-23T15:39:49+5:30

मीररोडच्या हॅप्पी होम संकुलात राहणाऱ्या पिटर वाझ यांचा इंटरनेटचा व्यवसाय आहे. परंतु, इंटरनेट बंद असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या व खात्री केली असता प्लग, ओएनयू, पोर्ट सारखी उपकरणे चोरीला गेल्याची आढळून येत होते.

Consumer complaints that the internet is off, a different truth unfolded | इंटरनेट बंद असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी, उलगडलं वेगळचं सत्य

इंटरनेट बंद असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी, उलगडलं वेगळचं सत्य

Next
ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेच्या बालदा भवन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता वांझ यांच्याकडे पूर्वी काम करणारा रणवीर प्रकाश लोकरे ऊर्फ सतिष हा उपकरणे चोरताना आढळून आला. 

मीरारोड - इंटरनेट केबलची उपकरणे चोरणाऱ्या त्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीररोडच्या हॅप्पी होम संकुलात राहणाऱ्या पिटर वाझ यांचा इंटरनेटचा व्यवसाय आहे. परंतु, इंटरनेट बंद असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या व खात्री केली असता प्लग, ओएनयू, पोर्ट सारखी उपकरणे चोरीला गेल्याची आढळून येत होते. भाईंदर पश्चिमेच्या बालदा भवन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता वांझ यांच्याकडे पूर्वी काम करणारा रणवीर प्रकाश लोकरे ऊर्फ सतिष हा उपकरणे चोरताना आढळून आला. 

याप्रकरणी रणवीरवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाझ यांचे इंटरनेटचे ग्राहक तुटून अन्य ऑपरेटर ना फायदा व्हावा किंवा चोरीच्या उद्देशाने रणवीर हा चोऱ्या करत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Consumer complaints that the internet is off, a different truth unfolded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.