मीटर शिवाय वीजेचा वापर; सहा हजार ग्राहकांना कायदेशीर कारवाईचा इशारा
By कुमार बडदे | Published: April 5, 2023 07:32 PM2023-04-05T19:32:29+5:302023-04-05T19:33:17+5:30
त्या ग्राहकांना थकबाकी बाबतची दुसरी नोटीस कंपनी मार्फत देण्यात आली आहे.
कुमार बडदे (मुंब्रा )
मुंब्राः कळवा-मुंब्रा-दिवा येथील ज्या सहा हजार वीज ग्राहकांचे विद्युत मीटर महावितरणच्या काळात कायमस्वरुपी बंद(पीडी) करण्यात आले होते. त्या ग्राहकांनी त्यांची थकबाकी अद्याप भरलेली नसून, ते ग्राहक विद्युत मीटर शिवाय वीजेचा वापर करत असल्याचे वीज वितरण करत असलेल्या टोरंट पावर कंपनीच्या निर्दशनास आले आहे. त्या ग्राहकांना थकबाकी बाबतची दुसरी नोटीस कंपनी मार्फत देण्यात आली आहे.
ज्या ग्राहकांचे मीटर पीडी झाले असतील त्या ग्राहकांनी त्यांच्या थकबाकी किंवा देयका बाबत काही शंका किंवा वाद असतील तर कल्याण-शीळ रस्त्यावरील अरिहंत अपार्टमेंन्ट या इमारतीमध्ये असलेल्या कंपनीच्या कार्यालयात सोमवार आणि मंगळवारी उपस्थित रहात असलेल्या महावितरणच्या अधिका-यांशी सकाळी ११ ते २ वाजण्या दरम्यान संपर्क साधून तक्रारीचे निरसन करुन घ्यावे.
पीडी ग्राहकांनी ग्राहक कक्षाशी संपर्क साधून त्यांच्या देयकाची रक्कम भरुन कायदेशीर वीज जोडणी करुन घ्यावी.ज्यांना दुसरी नोटिस पाठवण्यात आली आहे त्यांना नियमानुसार तिसरी नोटिस पाठवण्यात येणार असून,त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही,तर त्यांच्यावर वीज कायदा अधिनियमनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कंपनीने दिला आहे. आहे.