मुंबई विभागात मध्य रेल्वेची कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 08:10 PM2020-07-24T20:10:25+5:302020-07-24T20:10:42+5:30
लवकरच अंमलात आणल्या जाणार्या पुढील टप्प्यात स्वयंचलित क्यूआर-कोड आधारित तिकीट तपासणीसह प्रवेश/बाहेर पडताना फ्लॅप-बेस आधारित गेट बसवण्याचे नियोजन केले जात आहे.
डोंबिवली: कोविड १९ साथीचा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिकीट तपासणी कर्मचार्यांसाठी 'चेक इन मास्टर' नावाचे अॅप लाँच केले आहे. हे कोणत्याही भीतीशिवाय त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात मदत करेल. यामध्ये सुरक्षित अंतरावरून आरक्षित (पीआरएस) आणि अनारक्षित (यूटीएस) तिकिटे तपासण्यासाठी ओसीआर आणि क्यूआर कोड स्कॅनिंगची वैशिष्ट्ये आहेत. प्रवाशांच्या थर्मल स्क्रीनिंगसाठी हँडहेल्ड थर्मल गनदेखील देण्यात आल्या आहेत.
लवकरच अंमलात आणल्या जाणार्या पुढील टप्प्यात स्वयंचलित क्यूआर-कोड आधारित तिकीट तपासणीसह प्रवेश/बाहेर पडताना फ्लॅप-बेस आधारित गेट बसवण्याचे नियोजन केले जात आहे. हे 'चेकइन मास्टर अॅप' तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या उपस्थिती आणि रिअल टाइम देखरेखीसाठी वापरले जाऊ शकते. हे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (आरईसीएल) च्यासीएसआर अंतर्गत केले गेले आहे आणि यासाठी रेल्वेचा खर्च शून्य झालेला आहे.
अलीकडेच मुंबई विभागानं तिकीट तपासणी कर्मचार्यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अॅड्रेस सिस्टम उपलब्ध करून दिलं आहे जे सोशल डिस्टंसिंग पाळून प्रवाशांशी संवाद साधू शकतील. ट्रेनमध्ये बसण्यासाठी येताना प्रवाशांना स्टेशनवर मार्गदर्शन करण्यासाठी व मदत करण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरेल.