कंटेनर शाखा अनाधिकृत बांधकामांचा भाग नाही, प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती

By अजित मांडके | Published: January 31, 2024 03:15 PM2024-01-31T15:15:58+5:302024-01-31T15:17:28+5:30

शिवसेनेचे आमदार सरनाईक यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली.

Container branch is not part of unauthorized constructions, says Pratap Saranaik | कंटेनर शाखा अनाधिकृत बांधकामांचा भाग नाही, प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती

कंटेनर शाखा अनाधिकृत बांधकामांचा भाग नाही, प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती

ठाणे : घोडबंदर भागात कंटेनरमध्ये उभारलेली शाखा ही जर महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर असेल तर ती दुसºया जागेवर हलविली जाईल अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यातही शहरात इतर ठिकाणी असलेल्या शाखांचा नागरीकांना अडथळा असेल किंवा त्याअनुषंगाने तक्रारी केल्या असतील तर द्या देखील दुसरीकडे हलविल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु कंटनेर शाखा ही अनाधिकृत बांधकामाचा भाग होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार सरनाईक यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. घोडबंदर मार्गावरील धर्मवीर नगर येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर कंटेनर शाखा उभारल्यासंदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.  हा भुखंड बालउद्यान, पोलीस ठाणे तसेच ओपन जीमसाठी आरक्षीत आहे. या भुखंडावर २०२०- २१  साली केळकर यांच्या प्रयत्नाने संरक्षक पत्रे लावण्यात आले. तसेच या भुखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. असे असतानाही सर्व्हेक्षण सुरू होताच २४ जानेवारीला या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवण्यात आला. त्यानंतर त्यावर ध्वज चढवत, फोटो लावत या कंटेनरचे रुपांतर शाखेत करण्यात आले. त्यामुळे ही शाखा हटवून भुखंड ताब्यात घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती.

त्यानंतर बुधवारी सरनाईक यांना या संदर्भात छेडले असता, शाखेतून सर्वसामान्यांची कामे होत असल्याने कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे. परंतु ती जर महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर असेल तर ती तेथून हलविण्यात येईल असे स्पष्ट केले. वास्तविक पाहता ही शाखा माझ्या मतदार संघात नसून ती केळकर यांच्याच मतदार संघात आहे. त्यातही या शाखेमुळे आरक्षणाचा विकास रखडत असेल तर शाखा इतरत्र हलविण्याच्या सुचना शिवसैनिकांना दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या जागेत अनाधिकृत बांधकाम होण्यापेक्षा कंटनेर शाखा उभी राहत असेल आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा केली जात असले तर त्यात चुकीचे असे काही नाही. परंतु या विषयाचा गाजावाजा करायची गरज नव्हती असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे केळकर यांना लगावला.

Web Title: Container branch is not part of unauthorized constructions, says Pratap Saranaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे