रेती बंदर येथे कंटेनर पुलावरुन खाडीत पडला; सुदैवाने चालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 09:00 PM2020-08-03T21:00:28+5:302020-08-03T21:00:40+5:30
नावासेवा येथून भिवंडीकडे येत असलेला हा कंटेनर खारीगाव रेती बंदर खाडीत येथील पुलावरून सोमवारी पडला. पुलाचा कठडा तोडून हा कंटेनर 60 फूट खोल खाडीत पडला
ठाणे : येथील रेती बंदर खाडीत तब्बल 60 ते 70 फुट पुलावरुन कंटेनर आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास पडला. कशेळी पुलाजवळ यातील चालकास बाहेर काढण्यात आले. तो सुदैवाने बचावला असून त्याचा उचवा हात या अपघातात मोडला आहे.
नावासेवा येथून भिवंडीकडे येत असलेला हा कंटेनर खारीगाव रेती बंदर खाडीत येथील पुलावरून सोमवारी पडला. पुलाचा कठडा तोडून हा कंटेनर 60 फूट खोल खाडीत पडला. तो पुढे कशेळी पुलाच्या परिसरात खारीगांव टोलनाक्याजवळ खाडीच्या पाण्यात दिसून आला. यावेळी ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण पथकाने एका बोटीच्या सहाय्याने पाण्यातील कंटनेरचे ठिकाण गाठले. त्यातील चालकास बाहेर काढून त्याला तत्काळ माजिवडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रमेश पांडे, या नावाचा हा चालक सुदैवाने बचावला आहे. या अपघातात त्याचा उजवा हात मोडला आहे. या रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.