कंत्राटी सफाई कामगार पुन्हा कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:49 PM2018-10-29T20:49:56+5:302018-10-29T20:50:53+5:30

दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कल्याण डोंबिवली  महापालिकेच्या कंत्रटी सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून पुन्हा कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रत काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतू वाहनांचे नुकसान केले तर फौजदारी कारवाई केली जाण्याची तंबी मिळाल्याने आंदोलकांनी खंबाळपाडा आगाराच्या भुखंडावर ठिय्या केला होता.

Contract Workers Again Workshop Movement | कंत्राटी सफाई कामगार पुन्हा कामबंद आंदोलन

कंत्राटी सफाई कामगार पुन्हा कामबंद आंदोलन

Next

डोंबिवली - दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कल्याण डोंबिवली  महापालिकेच्या कंत्रटी सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून पुन्हा कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रत काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतू वाहनांचे नुकसान केले तर फौजदारी कारवाई केली जाण्याची तंबी मिळाल्याने आंदोलकांनी खंबाळपाडा आगाराच्या भुखंडावर ठिय्या केला होता. अखेरीस महापालिका अधिका-यांनी पोलिस बळाचा वापर करत आरसी वाहने रस्त्यावर आणून स्वच्छतेला सुरूवात केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेच्या माध्यमाने हे आंदोलन केले जात असून पंधरवडय़ापूर्वीही कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी विशाल सव्र्हीस या पुण्याच्या ठेकेदाराने तीन महिन्यांचा पगार थकीत केला होता. त्यावेळी आयुक्त गोविंद बोडके यांनी मध्यस्थि करत ठेकेदाराला पगार देण्यास सांगितले होते. तसेच वेतनासाठी ठेकेदाराच्या 1 कोटी 27 लाखांपैकी 6क् लाखांचा निधी देण्यात आला होता. त्यानूसार ठेकेदाराने कामगारांचे एका महिन्याचे वेतन दिले होते, तसेच उर्वरीत वेतन गेल्या आठवडय़ात  सोमवारी होणो अपेक्षित होते. मात्र महापालिकेने ठेकेदाराचे उरलेले 67 लाख अदा न केल्याने ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन थकवले. अखेरीस सोमवारी कंत्रटी कामगारांनी इशारा देत सकाळपासून आंदोलन सुरू केले. खंबाळपाडा आगाराच्या प्रवेशद्वारावर कंत्रटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या वेळेतील स्वच्छतेचे नियोजन सपशेल कोलमडले होते. त्यावर महापालिकेच्या विविध प्रभागांमधील सफाई कामगारांसह अन्य कामगारांना आवाहन करत अधिका-यांनी तातडीने स्वच्छतेसाठी येण्याचे आवाहन केले. त्याला कर्मचा-यांनी प्रतिसाद दिला, आणि तातडीने कामाला सुरूवात झाली. स्वच्छता विभागाचे सहाय्यक अधिकारी विलास जोशी यांनी टिळक नगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत कुमक बोलावून घेतली. खंबाळपाडा आगारातील कचरा वाहक गाडय़ा सकाळी साडेआठ नंतर तातडीने शहरात नेण्यात आल्या. महापालिकेच्या वाहनचालकांनी आरसी गाडय़ा शहरात नेल्या. आणि सकाळी 9 नंतर शहरातील बहुतांशी भागांमधील कच-याच्या स्वच्छतेला सुरूवात झाली होती.

आंदोलनकत्र्या कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी सांगितले की, महापालिकेने संबंधित ठेकेदाराच्या खात्यात 67 लाखांचा निधी जमा केल्याची माहिती मिळाली, परंतू तो निधी कामगारांच्या खात्यामध्ये जो र्पयत जमा होणार नाही तोर्पयत सफाई कामगार कामावर हजर राहणार नाहीत अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संध्याकाळर्पयत हा तिढा सुटू शकलेला नसला तरी महापालिकेने मात्र सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय केली जाणार नाही असे स्पष्ट केले.संबंधित आंदोलनकत्र्या सफाई कामगारांनी त्यांचा ठेकेदाराशी असलेला वाद मिटवावा, आणि लवकर कामावर हजर व्हावे असे आवाहन जोशी यांनी केले.

Web Title: Contract Workers Again Workshop Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.