कंत्राटी सफाई कामगारांचा आज संप
By admin | Published: February 3, 2016 02:11 AM2016-02-03T02:11:53+5:302016-02-03T02:11:53+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतनाचा प्रश्न अद्यापी मार्गी न लागल्याच्या विरोधात पालिकेच्या सुमारे दोन हजार कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी (३ फेब्रुवारी) श्रमजिवी कामगार संघटनेच्या
भार्इंदर : गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतनाचा प्रश्न अद्यापी मार्गी न लागल्याच्या विरोधात पालिकेच्या सुमारे दोन हजार कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी (३ फेब्रुवारी) श्रमजिवी कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली एक दिवसीय संप पुकारण्याचा निर्धार केला आहे.
पालिकेने २०१२ पासून स्थानिक कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढून मुंबईच्या मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला सफाईचा ठेका दिला आहे. त्यामुळे बेरोजगारीची वेळ आलेल्या स्थानिक कंत्राटदारांनी राजकीय हस्तक्षेपातून सफाईचा उपठेका प्राप्त केला आहे. या कंत्राटात सुमारे दोन हजार कंत्राटी सफाई कर्मचारी काम करीत असून त्यांना अद्यापही किमान वेतनाचा लाभ त्या कंत्राटदारांने दिलेला नाही. तो मिळावा, यासाठी त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला असला तरी नेहमीप्रमाणे त्यांना आश्वासनांचे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी केलो. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंडीत यांच्या नेतृत्वाखाली २२ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी सफाई मोहिमेंतर्गत मोर्चा काढला होता. त्यावेळी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी कर्मचाऱ्यांना त्यांची मागणी रास्त असल्याचे सांगून किमान वेतन लागु करण्यासाठी पालिकेला निर्देश देण्याची ग्वाही दिली होती. त्यालाही बगल दिल्याने कर्मचाऱ्यांनी पालिकेला १६ नोव्हेंबर २०१५ पासून बेमुदत असहकाराचा इशारा देताच पालिकेने जानेवारी २०१६ पासून किमान वेतनाचा लाभ लागु करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. जानेवारी उलटल्यानंतरही प्रशासनाने ही मागणी मान्य न झाल्याने एकदिवसीय संपाचा निर्णय झाला.