संचारबंदीतही सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:26 PM2020-03-30T17:26:32+5:302020-03-30T17:33:40+5:30

कोरोनामुळे अडसर निर्माण होऊन, ३० जूनअखेर मार्च ऐडिंग होईल असे जाहीर झाले होते. मात्र राज्यशासनाने याच ३१ मार्चला मार्च ऐडिंग होईल, असे जाहीर केल्याने, ठेकेदारांची बांधकाम विभागात एकच गर्दी उडाली आहे.

Contractor crowd in Jawahar's public works department even in the area of communication | संचारबंदीतही सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांची गर्दी

संचारबंदीतही सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांची गर्दी

Next

- हुसेन मेमन

जव्हार : लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आदेश असताना  व सरकारी ऑफिसमध्ये फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांना थांबता येईल असे राज्य शासनाचे आदेश आहेत. मात्र ३१ मार्च ऐडिंग असल्याचे जाहीर केल्याने बिल काढण्यासाठी 30 मार्च सोमवार सकाळ पासून जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांची एकच गर्दी पहायला मिळत आहे. 

  कोरोनामुळे अडसर निर्माण होऊन, ३० जूनअखेर मार्च ऐडिंग होईल असे जाहीर झाले होते. मात्र राज्यशासनाने याच ३१ मार्चला मार्च ऐडिंग होईल, असे जाहीर केल्याने, ठेकेदारांची बांधकाम विभागात एकच गर्दी उडाली आहे. बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार यांनी संचारबंदीचे नियम धुडकावत बिले काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया बाहेर ठेकेदारांच्या गाड्यांची लांबच लांब रांग दिसत होत्या. त्यातच कार्यालयाच्या बाहेर  ठेकेदारांची ये-जा सुरु होती. त्यामुळे राज्य शासनाने लावलेले नियम सर्वसामान्य लोकांसाठी कि धंनदांडग्या ठेकेदार आणि अधिका-यांसाठी अशी चर्चा शोशल मीडियातून सुरु आहे. गर्दीचे चित्र जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर पहायला मिळाले आहे.

मागील वर्षी सन २०१९ ला ३१ मार्च ऐडिंगला याच जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांची बिल्ले काढण्यासाठी, शासकीय कामे कार्यालयात न करता आप-आपल्या घरी जाऊन बिले काढण्याची कामे केली होती. त्यामुळे तो कर्मचारी शासकीय काम हे त्याच्या घरी करतो, म्हणून काही वैतागलेल्या ठेकेदारांनी त्या कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन लॅपटॉप फोडून, धक्काबुक्की केल्याचेही प्रकार घडले होते. मात्र या वर्षी याला अपवाद कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने, कार्यालयेही बंद करून, फक्त पाच टक्केच अधिकारी, कर्मचारी राहतील असे असतांनाही, कोरोनाला न घाबरता बिल्ले कागढण्यासाठी ठेकेदारांची गर्दी दिसत आहे.

Web Title: Contractor crowd in Jawahar's public works department even in the area of communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.