जुने पाइप टाकून ठेकेदाराने वसूल केले आठ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:27+5:302021-02-18T05:15:27+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे ठेकेदारांकडून ठामपाला गंडा घातला जात आहे. असाच गंडा जलवाहिन्यांच्या कामांमध्ये घातल्याचा आरोप विरोधी ...

The contractor recovered Rs 8 crore by throwing old pipes | जुने पाइप टाकून ठेकेदाराने वसूल केले आठ कोटी रुपये

जुने पाइप टाकून ठेकेदाराने वसूल केले आठ कोटी रुपये

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे ठेकेदारांकडून ठामपाला गंडा घातला जात आहे. असाच गंडा जलवाहिन्यांच्या कामांमध्ये घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी बुधवारी केला. कल्याणफाटा ते दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत जुन्या जलवाहिन्या टाकून एमकेई इन्फ्रा आणि जस्मिन कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी ठामपाकडून ८ कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे याच कंपन्यांना ठाणे शहरात अन्य ठिकाणी सुमारे २०० कोटी रुपयांची कामेही दिली असल्याचा भंडाफोड त्यांनी केला.

या कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे साहित्य वापरल्याची माहिती पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी कल्याणफाटा येथे केलेल्या पाहणीमध्ये तेथे टाकलेले पाइप हे जुने असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर चक्क २०१० साल नोंदविले असल्याचे दिसले. अवघ्या ३० रुपये किलोने ते खरेदी करून ठेकेदाराने ठामपाला गंडा घातला. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यांमुळे ही लूट सुरू असून ठाणेकरांचा पैसा कसा वाया घालवला जात आहे, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे. आता सदर ठेकेदाराकडून या जलवाहिन्या बुजविण्यात येणार आहेत. त्या बुजविल्या तर पुरावेही नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्त आणि महापौरांनी तत्काळ याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.

Web Title: The contractor recovered Rs 8 crore by throwing old pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.