उशिरा पगार काढणाऱ्या त्या ठेकेदाराचा ठेका होणार रद्द, पालिकेने सुरु केली तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:19 PM2018-08-10T16:19:02+5:302018-08-10T16:20:58+5:30
मागील दोन वर्षापासून कामगारांचे पगार उशिराने काढणाºया ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. या संदर्भात येत्या १८ आॅगस्ट रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.
ठाणे - आॅटोमेशनच्या नावाखाली किंबहुना पालिकेतील विविध विभागातील कारभार एकाच छताखाली आणून आयटी सेव्ही कारभार करण्याचा प्रयत्न अंगलट आल्याचे उघड झाल्यानंतर याची दखल आता महापौरांबरोबरच पालिकेने सुध्दा घेतली आहे. वांरवांर ठेकेदाराकडून त्याच त्याच चुका होत असल्याने आता संबधींत ठेकेदाराचा ठेका रद्द करुन त्याची अनामत रक्कमही पालिका जमा करणार आहे. त्यानुसार पुढील महिन्यापासून कामगारांचा पगार वेळेतच निघणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांचा समन्वय साधून कामकाजात सुसूत्रता यावी तसेच महापालिकेचा कारभार पेपरलेस व्हावा या उद्देशातून प्रशासनाने ईआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) ही संगणक प्रणाली सुरु केली. मात्र, मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रणालीतील त्रुटी अजूनही संबंधित ठेकेदाराला दूर करता आलेल्या नसल्यामुळे महापालिका कर्मचाºयांचे पगार उशीराने होऊ लागले आहेत. पाच ते सहा दिवस पगार उशीराने होत असल्यामुळे त्यांचे कर्जाचे हफ्ते ठरलेल्या वेळेवर भरले जात नाही. त्यामुळे अतिरिक्त शुल्काचा भार कर्मचाºयांवर पडत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर महापौरांनी याची दखल घेतली. त्यानंतर आता पालिकेनेसुध्दा याची दखल घेत, कामगारांच्या पगार हाती दिला आहे.
परंतु यापुढे जाऊन आता संबधींत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार त्याला पत्रव्यवहार करण्यात येणार असून, येत्या १८ आॅगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक लावण्यात आली आहे. या बैठकीत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. यापुढेही जाऊन त्याची १ कोटी २० लाखांची अनामत रक्कमही पालिका आपल्याकडे जमा करणार आहे.
या संदर्भात बैठक लावण्यात आली असून संबधींत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचेही निश्चित करण्यात येत आहे. परंतु यावर नवीन काही प्रणाली शोधता येईल का? याचा अभ्यासही सुरु झाला आहे.
(ओमप्रकाश दिवटे - उपायुक्त, आस्थापना, ठामपा)