कंत्राटदाराची हकालपट्टी, एसटीच्या जागेचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:04 AM2018-12-24T04:04:06+5:302018-12-24T04:04:24+5:30
अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवरील बेकायदा वाहनतळ विनापरवाना पावतीपुस्तकाचा वापर करत दुचाकी वाहनचालकांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जात होते.
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवरील बेकायदा वाहनतळ विनापरवाना पावतीपुस्तकाचा वापर करत दुचाकी वाहनचालकांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जात होते. या बेकायदा पार्किंगबाबत ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलत या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे.
अंबरनाथ रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागात असलेल्या आणि विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या अखत्यारित असलेल्या एसटी आगाराची जागा पडून आहे. या जागेवर शहरातील नगरपालिकेची पार्किंगची जागा कमी पडू लागल्याने अंबरनाथ रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागातील विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या अखत्यारित असलेल्या एसटी डेपोच्या जागेवर दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे दुचाकी उभ्या केल्या जातात. यामुळे तेथे वाहतूककोंडी होते. त्यात अंबरनाथ पश्चिम भागात स्टेशन परिसरात एसटी महामंडळाच्या भूखंडावर पूर्वीच्या कंत्राटदाराकडून पार्किंग बंद केले होते. मात्र, अद्याप एसटी महामंडळाकडून नवीन पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारची निविदा काढली नव्हती.
या जागेवर एका कंत्राटदाराकडून दुचाकी वाहनचालकांना बेकायदेशीरपणे जुन्या कंत्राटदाराच्या नावावरील एसटी महामंडळाच्या पावतीपुस्तकाचा आधार घेत, दुचाकीचालकांकडून पार्किंगचे शुल्क वसूल करत होता. तसेच ज्या जुन्या ग्राहकांना तीन महिन्यांचे पार्किंगचे पास काढले होते.
त्या ग्राहकांना जुना कंत्राटदार सोडून गेल्याने पुन्हा नवीन पास काढण्याची सक्ती या कंत्राटदाराकडून केली जात होती. अखेर, याप्रकरणी एसटी महामंडळाच्या अधिकाºयांशी संपर्ककेला असता, धक्कादायक माहिती समोर आली.
एसटी महामंडळाच्या या भूखंडावर नवीन पार्किंगसाठी अद्याप निविदाच काढली नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली. त्यामुळे येथे सुरू असलेले पार्किंग बेकायदेशीरपणे सुरू असून कंत्राटदाराकडून वाहनचालकांची लूट सुरू असल्याचे काहींनी समोर आणले.
आता विनाशुल्क पार्किंग
याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली असता, या बातमीची दखल एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी घेत तत्काळ याप्रकरणी हालचाली करत दुचाकी वाहनचालकांकडून बेकायदा वसुली करणाºया कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे या जागेवर आता शहरातील नागरिक विनाशुल्क पार्किंग करत आहेत.