सावरकर बंधूंच्या पत्नींचे योगदान मोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:16+5:302021-08-17T04:45:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : सावरकर बंधू जेव्हा कारावासात होते, त्यावेळी अत्यंत कठीण काळात त्या तिघांच्या पत्नींनी केलेले कार्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सावरकर बंधू जेव्हा कारावासात होते, त्यावेळी अत्यंत कठीण काळात त्या तिघांच्या पत्नींनी केलेले कार्य मोलाचे आहे. पतीच्या ध्येयवादी वृत्तीला त्यांनी साथ देत हालअपेष्टा सहन केल्या. सुखाच्या अपेक्षांना तिलांजली देत ब्रिटिश राजवटीत त्यांनी दिलेल्या या योगदानाला मनाचा सॅल्युट, अशा शब्दांत प्रख्यात मुलाखतकार आरती मुनीश्वर यांनी त्यांचे कौतुक केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ डोंबिवली पूर्व संचालित श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालयातर्फे ‘सावरकरांच्या समिधा’ या विषयावर झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.
यशोदा गणेश सावरकर, यमुना विनायक सावरकर, शांताबाई नारायण सावरकर या तिघींच्या जीवनावर, कार्यावर त्यांनी भाष्य केले. त्या तिघींनी पडद्यामागे राहून आपल्या पतीला क्रांती कार्यात दिलेला सहभाग या विषयावर हे व्याख्यान होते. त्या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, वाचक, ग्रंथालय कर्मचारी आदी उपस्थित होते. स्वातंत्र दिनाला मंडळातर्फे ध्वजवंदनाने या उपक्रमाची सांगता झाली. संपूर्ण उपक्रम कोविड नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
या निमित्ताने ग्रंथालयात सोमवारी बाल विभागातील वाचकांसाठी थोर क्रांतिकारकांच्या वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाल वाचकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
----------
फोटो आहे