खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि १० टिएमटीच्या मिडी बसेसची अॅम्ब्युलेन्समध्ये रुपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 02:39 PM2020-05-23T14:39:28+5:302020-05-23T14:39:59+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कोरोना बाधीत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि टीएमटीच्या आणखी १० मिडी बसेसचे रुपांतर अॅब्युलेन्समध्ये करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता रुग्णांना वेळेत अॅम्ब्युलेन्स मिळतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांना अॅम्ब्युलेन्स मिळत नाहीत अशी ओरड सर्वांचीच होती, किंबहुना रुग्णांचे हालही या ठाण्याने पाहिले आहेत. परंतु आता तीनही परिमंडळांसाठी महापालिकेने अॅम्ब्युलेन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता त्या पुढे जाऊन १० खाजगी वाहने, ७ स्कुल बसेस आणि आणखी १० टिएमटीच्या मिडी बसेसचे रुपांतर अॅम्ब्युलेन्समध्ये करण्यात आले आहेत. त्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली असून टीएमटीचा स्टाफही यासाठी कामासाठी नेमण्यात आले आहेत.
मागील काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णांना वेळेत अॅम्ब्युलेन्स न मिळणे, अॅम्ब्युलेन्स अभावी रुग्णांची मृत्यु होणे, या मुद्यावरुन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. अखेर महापालिकेने कंत्राटी स्वरुपात अॅम्ब्युलेन्स घेण्याचा निर्णय घेतला आहे. तीन परिमंडळाअंतर्गत १० ते १५ अॅम्ब्युलेन्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता या पुढे जाऊन पालिकेने १० खाजगी वाहने यामध्ये छोट्या मोठ्या वाहनांचा समावेश आहे. तर ७ स्कुल बसेस आणि आणखी १० टीएमटीच्या मिडी बसेसही आता अॅम्ब्युलेन्ससाठी वापरल्या जाणार आहेत. यापूर्वी १० बसेसचे रुपातंर अॅम्ब्युलेन्समध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर आता आणखी १० बसेस उपलब्ध होणार आहेत. ज्यांना कोरोनाची अधिकची लक्षणे नसतील त्यांच्यासाठी या अॅम्ब्युलेन्स उपयुक्त ठरतील असा दावा महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केला आहे. यासाठी अतिरिक्त चालकांचीही नेमणुक केली जाणार असून, १२ -१२ तासांसाठी चालकांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षेसासाठी देखील उपाय योजना केल्या जाणार आहेत.
यासाठी एका समन्वय अधिकाºयाची नेमणुक केली जाणार आहे. त्याच्याकडून या अॅम्ब्युलेन्सचे नियोजन केले जाणार आहे. शिवाय या अॅम्ब्युलेन्सचे नियोजन करण्यासाठी परिवहन सेवेतील नियोजन पाहणाºया अधिकाºयांची यासाठी नेमणुकही केली जाणार आहे. एकूणच आता मागील काही दिवसापासून सुरु असलेली ओरड आता बंद होणार आहे.