खंडणीसाठी सहशिक्षकाच्या धमक्या

By admin | Published: December 25, 2015 02:26 AM2015-12-25T02:26:09+5:302015-12-25T02:26:09+5:30

केंद्रप्रमुखाला घरी बोलवून पत्नीला त्याच्याशी लगट करायला लावून केलेले चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्याची धमकी येथील एका सहशिक्षकाने देऊन त्या केंद्रप्रमुखाकडून ४०

Coordinator threats for ransom | खंडणीसाठी सहशिक्षकाच्या धमक्या

खंडणीसाठी सहशिक्षकाच्या धमक्या

Next

भरत उबाळे, शहापूर
केंद्रप्रमुखाला घरी बोलवून पत्नीला त्याच्याशी लगट करायला लावून केलेले चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्याची धमकी येथील एका सहशिक्षकाने देऊन त्या केंद्रप्रमुखाकडून ४० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या दाम्पत्याकडून खंडणीकरिता वारंवार मागणी सुरू झाल्याने केंद्रप्रमुखाने आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडले आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत असून धमकी देणाऱ्या शिक्षक दाम्पत्याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
आटगाव येथे वास्तव्यास असलेले केंद्रप्रमुख वासुदेव हरी निमसे (४९) ज्या शाळेत नोकरी करतात, तेथेच एक शिक्षक दाम्पत्य नोकरी करते. एक दिवस बाजारपेठेत निमसे यांची त्या दाम्पत्याशी भेट झाली, तेव्हा त्यांनी त्यांना घरी येण्याचा आग्रह केला. घरी गेल्यावर त्या सहशिक्षकाने आपल्या पत्नीला निमसे यांच्याशी लगट करायला भाग पाडले. त्याचे स्वत: चित्रीकरण केले.
त्यानंतर, ही चित्रफीत व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित करण्याची धमकी देऊन ४० लाखांच्या खंडणीची मागणी केली. निमसे यांनी भीतीपोटी १० लाखांची खंडणी या दाम्पत्याला दिली. मात्र, उर्वरित ३० लाख रुपये देण्याची मागणी या दाम्पत्याने सुरू केल्याने निमसे हे मानसिक दबावाखाली आले.
बुधवारी सकाळी निमसे घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी निमसे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांना त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट आढळली. त्यामध्ये सहशिक्षकांकडून खंडणीकरिता दिल्या जात असलेल्या धमक्यांना कंटाळून आपण माहुली किल्ल्याच्या जंगलात जाऊन आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. निमसे यांच्या सुसाइड नोटमुळे अक्षरश: खळबळ उडाली आहे.

Web Title: Coordinator threats for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.