कोरोना: १८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:20+5:302021-05-19T04:41:20+5:30
------------------------------------------------------ कोयता आणि चाकूने हल्ला: १५ जणांवर गुन्हा कल्याण: येथील पश्चिमेकडील मोहने रोड, धाकटे शहाड परिसरात राहणारे प्रमोद लाखन ...
------------------------------------------------------
कोयता आणि चाकूने हल्ला: १५ जणांवर गुन्हा
कल्याण: येथील पश्चिमेकडील मोहने रोड, धाकटे शहाड परिसरात राहणारे प्रमोद लाखन आणि त्याचा भाऊ सिद्धनाथ या दोघांनी भांडण सोडविल्याच्या रागातून त्या दोघांवर कोयता आणि चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना मोहना रोड, बंदरपाडा परिसरात रविवारी संध्याकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी प्रमोद याने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुरेश सनय, सोमनाथ म्हात्रे, मंगेश म्हात्रे, सुनीता म्हात्रे, विजय म्हात्रे, सुमित्र म्हात्रे, दीपेश कदम, आकाश आडसूळ, राजू शेट्टी, रोशन सोनी अशा दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरेश सनय यानेदेखील तक्रार दिली असून, यात जुन्या भांडणाच्या रागातून रूपेश कोट, मंगेश नलावडे, प्रमोद लाखन, सिद्धार्थ लवटे, प्रकाश घनघाव या पाच जणांनी सुरेश सनय, सोमनाथ म्हात्रे आणि मंगेश म्हात्रे यांना बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारींवरून १५ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
-----------------------------------------------------