उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्ससह ९ जणांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:04 PM2022-01-10T19:04:59+5:302022-01-10T19:05:53+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यातील प्रत्येकांची कोरोना टेस्ट झालेली नसते.
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, लिपिक यांच्यासह ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यातील प्रत्येकांची कोरोना टेस्ट झालेली नसते. या सर्व रुग्णावर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व इतर कर्मचारी आपली सेवा देतात. रुग्णाना सेवा देतांना रुग्णालयाचे एक डॉक्टर, ५ नर्स, १ लिपिक व ३ इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर ताण निर्माण झाला असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. डॉक्टरसह अन्य कर्मचारी यांना असाच कोरोना संसर्ग झाल्यास, आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.