ठाणे जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:23 PM2020-12-15T16:23:14+5:302020-12-15T16:25:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना या साथीच्या आजाराविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना या साथीच्या आजाराविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. या कार्यक्र मांचे ठाणे जिल्ह्यातही आयोजन करण्यात आले आहे. लोककला आणि पथनाट्यांद्वारे शासनाने कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनप्रबोधन करण्यात येणार आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सात तालुक्यातील १४० गावांमध्ये या कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक नसलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ही जनजागृती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात चार संस्थांना शासनाने प्राधिकृत केले आहे . यासंस्थाच्या मार्फतीने ४० कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.
कलापथकांच्या माध्यमातून कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी, पाळावयाचे नियम याबाबत गाणी, नाटक, भारु ड, पोवाडा, बतावणी आणि गवळण आदी माध्यमामातून जनजागृती केली जाणार आहे. हे कलापथक जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन प्रबोधन करणार असल्याचे कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले.