ठाणे, उल्हासनगर रुग्णालयातील २७ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:42 AM2020-05-27T01:42:05+5:302020-05-27T01:42:05+5:30
पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या समस्या
ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयापाठोपाठ उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली असून बाधित कर्मचाºयांची संख्या आतापर्यंत २७ वर पोहोचली आहे. त्यापैकी २६ कर्मचाºयांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यासाठी रुग्णालय प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. एक कर्मचारी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झाली असून थेट मुलाखती घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू झाल्यावर तेथे वैद्यकीय कर्मचाºयांची राहण्याची व्यवस्था हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. ज्या हॉटेलमध्ये कर्मचारी वास्तव्यास आहेत, त्यातील एका कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांची चाचणी केली असता, २३ कर्मचाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रुग्णालय प्रशासनाने खबरदारी म्हणून कर्मचाºयांची टप्प्याटप्प्याने चाचणी केली. त्यात रुग्णालयातील एका ब्रदरसह दोन वॉर्ड बॉयचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील २६ जण पॉझिटिव्ह झाले असून, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील एका कर्मचाºयालादेखील लागण झाली आहे. अशा प्रकारे दोन शासकीय रुग्णालयांतील २७ कर्मचारी बाधित असून, २६ कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपसंचालकांकडून पाठवलेल्या कर्मचाºयांचा पत्ता नाही
कमी झालेल्या कर्मचाºयांमुळे उपसंचालक विभागाकडून नऊ कर्मचाºयांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, अद्यापही एकही कर्मचारी दाखल झालेला नाही. तीन कर्मचाºयांशी रुग्णालय प्रशासनाचा संपर्क झाला असून सहा कर्मचाºयांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे नऊ कर्मचारी मिळूनही त्यांचा अजूनसुद्धा पत्ता नाही, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
कंत्राटी भरती सुरू, थेट मुलाखती
अपुºया वैद्यकीय कर्मचाºयांमुळे सध्या जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून थेट मुलाखती सुरू झाल्या असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.