कोरोनामुळे २० सार्वजनिक मंडळांचा गणोशोत्सव रद्द; पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:08 PM2020-08-22T16:08:33+5:302020-08-22T16:08:57+5:30
९० मंडळांनी बसविला दीड दिवसाचा गणपती
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाचे संकट पाहता महापालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाना पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार २० सार्वजनिक मंडळांनी गणेश उत्सव रद्द केला आहे. तर ९० मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसाचा गणपती बसविला आहेत. कोरोना काळात मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद हा खरोखरच उल्लेखीन आणि सामाजिक भान जपणारा आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवलीचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.
महापालिका हद्दीत आठ पोलिस स्थानके आहे. या आठ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत २६५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपतीची स्थापना करता. त्याठिकाणी सजावट देखावे उभारले जातात. यंदा गणेश आगमन व विसजर्नाची मिरवणूक काढण्या पोलिसांनी बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी हा नियम केला आहे. आठही पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली असली तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे सोसल डिस्टसिंग पाळून कोरोनाला दूर ठेवणो गरजे आहे. त्यासाठी गणोश मंडळांना पोलिसांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला मंडळांनी प्रतिसाद दिला आहे.
२० मंडळांनी उत्सव रद्द केला आहे. तर ९० मंडळांनी दीड दिवसाचे पूजन लहान मूर्तीची स्थापना करुन केले आहे. उर्वरीत मंडळांनीही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करुन सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याची हमी पोलिस प्रशासनाला दिली आहे.यातून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. अनेक मंडळानी कोरोना जनजागृतीपर देखावे उभारले आहेत. हा गणेश उत्सव आरोग्यासाठी प्रबोधनात्मक ठरावा अशी आपेक्षा उपायुक्त पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
येत्या 30 ऑगस्ट रोजी मुहर्रम ताजिया साजरा केला जाणार आहे. मात्र मुस्लिम बांधवांनाही पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार २५ ठिकाणचा मुहर्रम ताजिया रद्द करण्यात येणार आहे, अशी हमी मुस्लिम बांधवांनी पोलिसांना दिली आहे कारण गणेश उत्सव व मुहर्रम ताजिया हे देखील एकाच वेळी आले आहेत. गणेश उत्सवाकरीता ६५० पोलिस कर्मचारी, १०० पोलिस अधिकारी आणि ३ राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत असे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.