ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या शंभरी पार ; ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:43 PM2020-04-06T18:43:01+5:302020-04-06T18:43:54+5:30
जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात नव्या १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही १०५ वर गेली आहे. तर यामध्ये आतापर्यत ६ जणांचा मृत्यु झाला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रु ग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत आहे. त्यात जिल्ह्यात १४ नव्या कोरोनाग्रस्त रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भार्इंदरमध्ये चार अशा १४ नव्या कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १०५ वर पोहोचला आहे. तर, कोरोनाने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप भिवंडीत एकही रु ग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे याच आजाराने मृत्यू होणार्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यात २४ तासात १४ नव्या कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भार्इंदरमध्ये चार रु ग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रु ग्णांची संख्या १०५ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यात ६ रु ग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालीची देखील नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईत दोन, ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. तर उल्हानगर महापालिका क्षेत्रात एक आणि ठाणे ग्रामीणमध्ये तीन करोनाबाधित रु ग्ण आहेत. दरम्यान, भिवंडी तालुक्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रु ग्ण आढळून न आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.