ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, चार जणांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 10:48 PM2020-12-31T22:48:24+5:302020-12-31T22:49:09+5:30
ठाणे शहरत १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५५ हजार ४४६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या आता एक हजार ३०८ झाली आहे
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी ३४३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह आता जिल्ह्यात दोन लाख ४३ हजार १७८ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त चार रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ९५८ झाली आहे. उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदरला, अंबरनाथ, बदलापूर आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकही मृत्यू झालेला नाही.
ठाणे शहरत १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५५ हजार ४४६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या आता एक हजार ३०८ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ८४ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. आता येथे ५७ हजार ४८३ बाधीत असून एक हजार १०२ मृतांची नोंद आहे. उल्हासनगरात ११ नवे रुग्ण आढळले असून या शहरात आता ११ हजार ३४७ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३६१ कायम आहे. भिवंडी शहरात तीन बाधीत आढळले आहेत. यासह आता या शहरात बाधीत सहा हजार ६०३ झाले असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्येत १७ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यू नाही. आता बााधीत २५ हजार ४१३ झाले आहेत, तर, मृत्यू ७८३ आहेत.
अंबरनाथमध्ये चार रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या आठ हजार २५० झाली असून मृतांची संख्या ३०२ आहे. बदलापूरमध्ये १३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ८६६ झाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ११९ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात सहा रुग्णांची वाढ झाल्याने १८ हजार ७६८ बाधितांची नोंद झालेेेेली असून मृतांची संख्या ५८० कायम आहे.