दोन दिवसाआड पितापुत्राचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:50+5:302021-04-14T04:36:50+5:30

--------------------------------------------------- रिक्षाचालकावर हल्ला कल्याण: सागर वन्नीस आणि शादुल शेख हे दोघे नशा करून सोमवारी संध्याकाळी चार वाजता पश्चिमेकडील दीपक ...

Corona died two days later | दोन दिवसाआड पितापुत्राचे कोरोनाने निधन

दोन दिवसाआड पितापुत्राचे कोरोनाने निधन

Next

---------------------------------------------------

रिक्षाचालकावर हल्ला

कल्याण: सागर वन्नीस आणि शादुल शेख हे दोघे नशा करून सोमवारी संध्याकाळी चार वाजता पश्चिमेकडील दीपक हॉटेलसमोरील रिक्षास्टॅण्डवरील रिक्षावाल्यांना विनाकारण शिव्या देत होते. यामुळे किरण जगताप या रिक्षाचालकाने त्या दोघांना जाब विचारला असता, वन्नीस याने त्याच्याजवळील ब्लेडने जगताप यांच्यावर वार केले तर शेखने मारहाण केली. या दोघांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------------------------

स्वामीनारायण मंदिरात चोरी

डोंबिवली: येथील पूर्वेकडील राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या पाच दानपेट्या उचकटवून त्यातील ३५ हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे रामनगर पोलीस ठाण्यापासून स्वामीनारायण मंदिर नजिकच आहे.

-----------------------------------------

बतावणी करून लूट

डोंबिवली: दोन भामट्यांनी बतावणी करून शकुंतला सुरवसे या ६३ वर्षीय महिलेच्या अंगावरील ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास उसरघर परिसरातील अपोला बिल्डिंगमध्ये घडली. सुरवसे या दूध घेऊन घरी परतत असताना हा प्रकार घडला.

-----------------------------------------------

दुचाकी चोरीला

कल्याण: जितेश कडेकर यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या पश्चिमेकडील गायकरपाडा येथील दीपक भालेराव चाळीत पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------------

Web Title: Corona died two days later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.