CoronaVirus News in Thane: कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याचे स्वागत, पुष्पवृष्टी, टाळ्यांचा कडकडाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 02:02 AM2020-05-01T02:02:01+5:302020-05-01T02:02:19+5:30
पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाºयाची कोरोनाची तपासणी निगेटीव्ह आल्यामुळे त्याला कळवा येथील खाजगी रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. याच आरोपींच्या संपर्कात आलेल्या वर्तकनगरच्या २२ कर्मचाºयांची सुरुवातीला तपासणी झाली. त्यात तीन कर्मचाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तिघांपैकी एकाला कळव्यातील सफायर रुग्णालयात, तर दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी यातील एकाची चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे बुधवारी रात्री ९.३0 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले. त्यावेळी पोलीस उपायुक्त अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, संतोष घाटेकर, रमेश जाधव यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तसेच ते वास्तव्यास असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील नवीन पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबीयांनीही त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
>आठ पोलिसांनी केली मात
आतापर्यंत ठाणे शहर आयुक्तालयातील २३ पैकी चार अधिकारी आणि चार कर्मचारी अशा आठ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २४ अधिकारी आणि १0३ कर्मचारी अशा १२७ पोलिसांना विलगीकरणात ठेवले आहे.