ठाण्यात १५ पोलिसांना कोरोनाची लागण: ८७ पोलीस आता विलगीकरणात
By जितेंद्र कालेकर | Published: April 18, 2020 12:34 AM2020-04-18T00:34:32+5:302020-04-18T00:41:52+5:30
लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाऱ्यांसह १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस दलात सध्या भीतीचे वातावरण आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाºया पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाºयांसह १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील ७२ कर्मचारी आणि १५ पोलीस अधिकाºयांना आता विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यामध्ये मुंब्रा, वर्तकनगर, ठाणेनगर, पोलीस मुख्यालय आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील कर्मचायांचा समावेश आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असले तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर कारवाई करीत असतांनाच पोलिसही कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याची
सुरु वात मुंब्य्रापासून झाली. येथील दोन निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाºयाला लागण झाल्यावर १९ कर्मचारी केंद्रात तर १९ कर्मचा-यांना घरात विलगीकरण केले. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या आधी दोन नंतर चौघांना लागण झाल्याचे समोर आहे. दोन कोरोनाबाधित आरोपींच्या संपर्कामुळे वर्तकनगरच्या तिघांना तर नारपोलीच्या एकाला लागण झाली. आतापर्यंत चार अधिकारी आणि ११ कर्मचारी अशा १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयांने दिली. खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंब्रा येथील ३८ तसेच वर्तनगरचे १४ केंद्रात तर ६ घरात विलगीकरणात आहेत. ठाणेनगरच्या सहा अधिकाºयांनाही घरातच विलगीकरणात ठेवले आहे. नारपोलीतील पोलीस कर्मचारी हा सातारा येथून आल्यानंतर त्याला थेट विलगीकरणात ठेवले होते. तिथून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. तो पोलीस ठाण्यात न आल्यामुळे तेथील एकाही कर्मचाºयाला विलगीकरणात ठेवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांवरील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर ठाण्यातही सॅनिटायझिंग व्हॅनची व्यवस्था केली आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ठिकठिकाणी ही व्हॅन फिरुन निर्जंतुकीकरणाचे काम करणार आहे. याशिवाय पोलिसांच्या सुरक्षेसाठी त्यांना पुरेशा प्रमाणात मास्क, हॅण्ड ग्लोज, पीपी किट पुरविली आहेत. तसेच पोलीस वसाहतींमध्येही मोठया प्रमाणात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.