पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कोरोनामुळे १२८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:40 AM2020-06-08T00:40:07+5:302020-06-08T00:40:15+5:30

३,८६१ पॉझिटिव्ह : सर्वाधिक मृत्यू कोपरखैरणे परिसरात

Corona kills 128 in Police Commissionerate | पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कोरोनामुळे १२८ जणांचा मृत्यू

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कोरोनामुळे १२८ जणांचा मृत्यू

Next

नवी मुंबई : शहरात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू कोपरखैरणे, तुर्भे व कामोठे परिसरात झाले आहेत. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनाचे तब्बल ३ हजार ८६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे टाळण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३ हजार ८६१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये परिमंडळ एकमध्ये २ हजार ७३३ तर परिमंडळ दोनमध्ये १००३ जणांचा समावेश आहे. तर आयुक्तालय कार्यक्षेत्रात १२८ जणांचे निधन झाले आहे. त्यापैकी परिमंडळ एकमध्ये ८८ जणांचे तर परिमंडळ दोनमध्ये ४० जणांचे निधन झाले आहे. परिमंडळ एकमध्ये शहरी भाग व दाट लोकसंख्या आहे. त्यामुळे संसर्ग अधिक पसरला आहे.
बैठ्या चाळी व एपीएमसी मार्केटशी संबंधित व्यक्तींचे तेथे वास्तव्य आहे. संपूर्ण आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत झाले आहेत.

पोलीस ठाणेनिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या

परिमंडळ एक
वाशी २५५
एपीएमसी २७९
कोपरखैरणे ५२७
रबाळे ४६८
रबाळे एमआयडीसी १८५
सानपाडा १५१
तुर्भे २४७
नेरूळ ४२१
एनआरआय १५७
सीबीडी ४३

परिमंडळ दोन
पनवेल सिटी ९६
पनवेल तालुका ३१
कळंबोली ११२
खारघर १४९
कामोठे २४९
तळोजा १३
खांदेश्वर १७७
उरण १५७
न्हावा-शेवा १६
मोरा ३


पोलीस ठाणेनिहाय
मृत्यूंची संख्या

परिमंडळ एक
वाशी ७
एपीएमसी ११
कोपरखैरणे १६
रबाळे ९
रबाळे एमआयडीसी ५
सानपाडा ४
तुर्भे १४
नेरूळ १४
सीबीडी ०
एनआरआय १०

परिमंडळ दोन
पनवेल सिटी ३
पनवेल तालुका ५
कळंबोली ६
खारघर ५
कामोठे १३
तळोजा २
खांदेश्वर ५
उरण १
न्हावा-शेवा 00
मोरा 00

च्कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत अधिक रूग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अशा ठिकाणी पालिकेकडून विशेष शिबिरे राबविली जात आहेत, तर पोलिसांकडूनही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर अंकुश लावला जात आहे.

Web Title: Corona kills 128 in Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.