कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:59+5:302021-06-04T04:30:59+5:30
------------------------ दुचाकी चोरी कल्याण : विकेशकुमार पाठक यांनी त्यांची दुचाकी पश्चिमेतील रेल्वे पार्सल कार्यालयाच्या बाजूला नवीन झालेल्या पुलाखाली पार्क ...
------------------------
दुचाकी चोरी
कल्याण : विकेशकुमार पाठक यांनी त्यांची दुचाकी पश्चिमेतील रेल्वे पार्सल कार्यालयाच्या बाजूला नवीन झालेल्या पुलाखाली पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना २७ मेच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पाठक यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------
आपत्कालीन कक्षातून टीव्ही चोरीला
डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातील टीव्ही चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे विभागीय कार्यालयातील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे सांगितले.
------------------------------------------
रस्त्याची रखडगाथा सुरूच
कल्याण : पूर्वेतील चेतना शाळा चककीनाका ते उल्हासनगर पेन्सिल फॅक्टरीपर्यंतचा १०० फुटी रस्ता १२ वर्षांपासून सुरू आहे. परंतु, तो अजूनही पूर्ण झालेला नाही. हा रस्ता खडेगोळवली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणापर्यंत झाला आहे. तो पेन्सिल फॅक्टरीपर्यंत पूर्ण झाला तरच त्याचा नागरिकांना फायदा होईल व पुणे लिंक रोडवरील वाहतूक कमी होण्यास मदत होईल. उर्वरित रस्ता लवकरात लवकर बनवावा, असे निवेदन राष्ट्रवादी प्रदेशचे सरचिटणीस व माजी नगरसेवक प्रकाश तरे यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.
------------
गटाराचे पाणी रस्त्यावर
डोंबिवली : पूर्वेतील व्ही.पी. रोडवर काही महिन्यांपासून गटार तुंबून त्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. हा रस्ता रहदारीचा असून, या पाण्यामुळे तेथे रोज दुचाकींचे घसरून अपघात होत आहेत. येथील रहिवाशांनी व दुकानदारांनी केडीएमसीकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे डोंबिवली शहर सरचिटणीस ज्ञानेश पवार यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे लक्ष वेधले आहे. आयुक्त तरी यात लक्ष घालतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
--------------------------