ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:54 AM2020-08-01T05:54:03+5:302020-08-01T05:54:16+5:30

नवे १५९३ रुग्ण सापडले : आरोग्य विभागाची माहिती

Corona kills 43 in Thane district on Friday | ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात एक हजार ५९३ नव्या कोरोना रुग्णांची शुक्रवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ८५ हजार ९५६ झाली असून ४३ रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या आता दोन हजार ३६५ झाली आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे ३५५ नवे रुग्ण सापडल्याने शहरातील रुग्णसंख्या १८ हजार ६९ झाली असून १० जणांचा मृत्यूने मृतांचा आकडा ६३७ वर गेला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ नवे रुग्ण सापडले, तर १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे रुग्णसंख्या १९ हजार ९६७ तर मृतांची संख्या ३५७ झाली आहे.मीरा-भार्इंदरमध्ये नव्या १२७ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाधितांची संख्या आठ हजार ३१४ तर मृतांची २७४ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये पंधरा हजारांचा टप्पा पूर्ण
नवी मुंबई : शुक्रवारी ३९८ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या तब्बल १५ हजार ३८५ झाली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाला आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्यापासून रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
शुक्रवारी ३९८ रूग्ण वाढले आहेत. नेरूळमध्ये सर्वाधिक ९८ रूग्ण वाढले आहेत. तर, एकूण बळींची संख्या ४१८ झाली आहे. दिवसभरात २४९ जण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १०,३६५ झाली आहे.

वसई-विरारमध्ये १५७ नवे रुग्ण
वसई-विरार शहरात शुक्रवारी १५७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णसंख्या ११ हजार ९९१ वर पोहोचली आहे. १३३ रुग्ण बरे होऊ न घरी परतले आहेत.

रायगडमध्ये ३३८ नवे रु ग्ण
रायगड जिल्ह्यात ३१ जुलै रोजी ३३८ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. बाधितांची संख्या १४ हजार ७७९ वर पोहोचली आहे.

Web Title: Corona kills 43 in Thane district on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.