कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:39 AM2021-03-21T04:39:36+5:302021-03-21T04:39:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे घरातील कुटूंबप्रमुखांची चिडचिड वाढल्यामुळे गृहिणी आणि ...

Corona lost her job; Domestic violence also increased | कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे घरातील कुटूंबप्रमुखांची चिडचिड वाढल्यामुळे गृहिणी आणि नवविवाहितांच्या जीवावरच ती उठली. त्यामुळे कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांसह दुर्दैवाने अन्याय, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक हिंसा, बाललैंगिक अत्याचार अशा २४५ गंभीर घटना कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत घडल्या आहेत.

जिल्ह्यातील महिलांसंबंधित जीवघेण्या व किळसवाण्या ४१४ कौटुंबिक हिंसाचारासह अन्य नराधमांकडून घडल्या आहेत. कोरोनाच्या महामारीतही महिलांवर अन्याय अत्याचार झालेले आहेत. गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत २४५ महिलांना हिंसाचाराच्या जीवघेण्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचाराच्या ८९ घटनांसह, बलात्कार आणि लैंगिक हिंसेच्या ५६ तक्रारींची नोंद कळवा रुग्णालयातील सखी वन स्टॉप सेंटरच्या जिल्हा केंद्रात झाली आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी व गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सखी वन स्टॉप सेंटर सुरू केले आहे. यासाठी जिल्हास्तरीय केंद्र येथील छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे सुरू आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधील अशा घटनांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कार्यकर्ते, पोलीस तत्पर असून संबंधित महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयीन दरवाजेही थोटावले जात आहेत.

कोरोनाच्या या कालावधीत महिलांवरील अन्याय, कौटुंबिकवाद, लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचे आढळले आहे. कळवा रुग्णालय हे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी दिले आहे. परंतु, महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी या रुग्णालयाच्या हिरकणी या छोट्याशा जागेत कोरोना काळातही जिल्हा केंद्र सुरू ठेवले. परंतु वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे पीडित महिलांना या केंद्रांवर येणे शक्य होत नसे. त्यांची ही गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या आदेशाने महिलांच्या मदतीसाठी कोरोना काळात हेल्पलाइन सुरू करून पीडित महिलांची मदत या सखी सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

.........

Web Title: Corona lost her job; Domestic violence also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.