‘माजिवडा-मानपाडा’ समितीला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:40+5:302021-05-30T04:30:40+5:30

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीला बसला आहे. या प्रभाग समितीत आतापर्यंत ३१ ...

Corona to the ‘Majivada-Manpada’ committee | ‘माजिवडा-मानपाडा’ समितीला कोरोनाचा विळखा

‘माजिवडा-मानपाडा’ समितीला कोरोनाचा विळखा

Next

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीला बसला आहे. या प्रभाग समितीत आतापर्यंत ३१ हजार ६२० रुग्ण आढळले असून त्यातील ३१ हजार ५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत येथे ३९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल नौपाडा प्रभाग समितीत २८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सर्वात कमी तीन हजार ३१५ रुग्ण हे मुंब्य्रात आढळले असून, त्यातील तीन हजार १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे येथे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या ७५ एवढी आहे.

ठाणे महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आतापर्यंत एक लाख २८ हजार ७४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक लाख २४ हजार ९४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एक हजार ९१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ७३४ जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीला बसला आहे. त्या खालोखाल नौपाडा, वर्तकनगर, कळवा, उथळसर, लोकमान्य-सावरकरनगर, वागळे आणि दिवा या प्रभाग समित्यांना बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत दिवसाला ४०० ते ५०० नवे रुग्ण आढळत होते. पहिल्या लाटेत झोपडपट्टी परिसरात रुग्ण अधिक होते. तर, दुसऱ्या लाटेत झोपडपट्टीसह गृहसंकुलांना कोरोनाचा विळखा बसला. या समितीत ३९९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल नौपाड्यातही रुग्णांची संख्या आणि मृत्यूही अधिक आहे. येथे २८१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अन्य प्रभाग समित्यांच्या तुलनेत मुंब्रा प्रभाग समितीला कोरोनाचा जास्त फटका बसलेला नाही. सध्या तेथे दररोज पाच ते आठ नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर, आतापर्यंत तेथे एकूण तीन हजार ३१५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील तीन हजार १३० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत येथे ११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ७५ जणांवर येथे उपचार सुरू आहेत.

प्रभाग समिती- एकूण रुग्ण - बरे झालेले रुग्ण - सध्या उपचार - मृत्यू

माजिवडा-मानपाडा- ३१,६२० - ३१,५८९ - ३७४ - ३९९

नौपाडा- १७,३७८ - १६,९२८ - ४५० - २८१

वर्तकनगर - १५,८०० - १५,४४० - १६७ - १९३

कळवा - १५,४९१ - १४,९८३ - २३९ -२६९

उथळसर - १३,११५ - १२,७१२ - २२७ - १७६

लोकमान्य - ११,६४० - ११,३१४ - १२९ - १९७

वागळे - ७,७४९ - ७,५०६ - ८४ - १५९

दिवा - ७,४१२ -७,१३७ - १७९ - ९६

मुंब्रा - ३,३१५ -३,१३० - ७५ - ११०

इतर - ५,०७१ - ४,९४३ - ९१ - ३७

----------------

Web Title: Corona to the ‘Majivada-Manpada’ committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.