कोरोनाबाधितास रुग्णालयात चालत येण्याचा सल्ला, आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:16 PM2020-05-22T17:16:03+5:302020-05-22T17:16:53+5:30
कोरोनाबाधित या रुग्णाला भर उन्हात चालत रुग्णालय गाठावे लागले. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाने त्याला आत घेतले नाही. त्याठिकाणीही तीन तास ताटकळत ठेवले गेले
कल्याण - डोंबिवली पश्चिमेतील एका कोरोना बाधित रुग्णाने रुग्णवाहिकेसाठी फोन केला असता त्याला चालत रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला गेला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गोपाळ सदन येथे राहणा:या तरुणाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याने महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णवाहिका पाठविण्यासाठी फोन केला होता. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याला चालत येण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
कोरोनाबाधित या रुग्णाला भर उन्हात चालत रुग्णालय गाठावे लागले. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाने त्याला आत घेतले नाही. त्याठिकाणीही तीन तास ताटकळत ठेवले गेले. त्यानंतर त्याला टाटा आमंत्रण येथे भरती करण्यात आले. हा रुग्ण मुंबईतील वाडिया रुग्णालयात वार्डबॉयचे काम करतो. याप्रकरणी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले आहेत. महापालिकेकडे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रुग्णाकरीता 33 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही याची चौकशी केली जाईल. हा रुग्ण पॉङिाटीव्ह असल्याने त्याला चालत येण्याचा सल्ला देणे अयोग्य होते. त्याचबरोबर रुग्णाने देखील चालत न येता थोडा वेळ रुग्णवाहिका येईर्पयत वाट पाहणो गरजेचे होते. यात नेमके काय झाले आहे. याचा तपास चौकशी अंती घेतला जाईल. दोषीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन व महापालिकेचा स्टाफ अत्यंत तत्पर आहे. यापूर्वी अशा प्रकारची घटना कोरोना रुग्णाच्या बाबतीत घडलेली नाही. कालचा प्रकार घडला. सोशल मिडियावर व्हायरल झाला. असा प्रकार घडणार नाही याची काळजी यापूढे प्रशासनाकडून घेतली जाईल. त्या प्रकारचे आदेश प्रशासनाला व रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर्सना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.