CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 18:41 IST2020-07-19T18:37:49+5:302020-07-19T18:41:40+5:30
CoronaVirus News: मानसिक स्थिती ठीक नसल्यानं रुग्णाला नवव्या मजल्यावरून पाचव्या मजव्यावर आणलं जात होतं. त्यावेळी त्यानं आत्महत्या केली.

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन एका कोरोना रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी चार वाजता घडली आहे. आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव प्रशांत कुंडलिक आंबेकर (40) असे आहे. तो डोंबिवली येथे राहणारा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
प्रशांतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याला महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला 9 व्या मजल्यावर रुम देण्यात आली होती. 17 जुलै रोजी प्रशांतला दाखल करण्यात आल्यानंतर तो दार उघड नव्हता. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तो दार उघडत व उपचार घेत नव्हता. हे पाहता आज डॉक्टरांनी मोठ्या अथक प्रयत्नांनी त्याला दार उघडण्यास भाग पाडले. प्रशांतच्या या वागण्याने संभ्रमात पडलेल्या डॉक्टर व स्टाफने प्रशांतला खाली घेऊन जाण्याची तयारी केली. 9 व्या मजल्यावरुन खाली येत असताना प्रशांतने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. या घटनेमुळे डॉक्टर व स्टाफला एकच धक्का बसला.