मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णाचा आकडा 242 ; दिवसभरात 7 नवीन रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 08:24 PM2020-05-09T20:24:24+5:302020-05-09T20:24:32+5:30

पालिकेने शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार दिवसभरात तब्बल 33 नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

Corona patient figure in Mira Bhayandar 242; 7 new patients throughout the day | मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णाचा आकडा 242 ; दिवसभरात 7 नवीन रुग्ण 

मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णाचा आकडा 242 ; दिवसभरात 7 नवीन रुग्ण 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क  
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये दिवसभरात कोरोनाचे 7 नविन रुग्ण आढळले असून अजून 158 जणांचे कोरोना चाचणी अहवाल यायचे आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 242 इतकी झालेली आहे .  

पालिकेने शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार दिवसभरात तब्बल 33 नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

आज शनिवारी सायंकाळी पालिकेने दिलेल्या अहवालात नव्याने दिवसभरात 7 कोरोना रुग्ण आढळले. नवीन आढळलेल्या 7 रुग्णां मध्ये भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टी मध्ये मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्याचा समावेश आहे. या शिवाय भाईंदरच्या राई शिवनेरी, खारीगाव व काशीगावच्या पंच बंगला शेजारी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. मीरारोडच्या शीतल नगर मधील नुपूर पॅलेस मध्ये आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. 

कोरोना लागण झालेले हे परिचारिका, कीटकनाशके फवारणी कर्मचारी, विध्यार्थी, गृहिणी, इस्टेट एजंट, वेल्डिंग काम कामगार आहेत. आता पर्यंत शहरात 7 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले असून 127 जण कोरोनातून बरे झालेले आहेत.

Web Title: Corona patient figure in Mira Bhayandar 242; 7 new patients throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.