CoronaVirus News: लोकल सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:30 AM2021-02-13T04:30:38+5:302021-02-13T04:31:41+5:30

CoronaVirus News: दररोज वाढतात सरासरी ६६ रुग्ण 

corona patient Increase after local starts | CoronaVirus News: लोकल सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ

CoronaVirus News: लोकल सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Next

नवी मुंबई/ ठाणे / रायगड / पालघर : रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली केल्यानंतर नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १ ते १२ फेब्रुवारी दरम्यान मनपा क्षेत्रात ७९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापुर्वीच्या १२ दिवसामध्ये ७१३ जणांना कोरोना झाला होता. सरासरीपेक्षा ८१ रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. 

रेल्वे सेवा सुरू होण्यापुर्वी प्रतिदिन सरासरी ५९ रुग्ण वाढत होते. लोकल सुरु झाल्यानंतर ही प्रमाणे प्रतिदिन सरासरी ६६ झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात ४३५ रुग्ण आढळले आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेतला असता १५ जानेवारीला लोकल सेवा सुरू झाली त्या दिवशी अवघे २९७ रुग्ण सापडले. त्यानंतरचे पहिले तीन दिवस अनुक्रमे ३७३, ३२५ आणि २२८ रुग्ण सापडले होते. या तर आताच्या गेल्या काही दिवसांच्या रुग्णसंख्येचा विचार करता शुक्रवारी २९० रुग्ण आढळले असून फक्त दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्या आधी गुरुवारी २७३, बुधवारी ३६४ रुग्ण सापडले होते. ९ फेब्रुवारीला २३६ आणि ८ फेब्रुवारीला केवळ २०० रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत मृतांच्या संख्येचा विचार करता मृतांची संख्या अत्यल्प आढळली. यामुळे लोकल सेवा सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढल्याचे फारसे दिसून येत नाही. 

रायगड जिल्ह्यातील काेराेनाचा कहर कमी झाला आहे. शुक्रवारी  पनवेल महापालिका हद्दील सर्वाधिक ३०, पनवेल ग्रामीणमध्ये ५, पेण तालुक्यात ४ खालापूर तालुक्यात ३ आणि अलिबाग तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील ५५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ६२ हजार ६०६ काेराेना रुग्णांची संख्या झाली आहे, तर ६० हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

विभाग     शुक्रवारची
    आकडेवारी 
ठाणे    २९०
नवी मुंबई    ७८
रायगड    ४३
वसई-पालघर    २४
 

Web Title: corona patient Increase after local starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.