ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ वर; एका दिवसात पुन्हा दोन रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:52 AM2020-03-31T00:52:55+5:302020-03-31T06:51:50+5:30

ठाण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Corona patients in Thane at 12; Increase of two patients again in one day | ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ वर; एका दिवसात पुन्हा दोन रुग्णांची वाढ

ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ वर; एका दिवसात पुन्हा दोन रुग्णांची वाढ

Next

ठाणे : कोरोनाचे आणखी दोन रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. ते वर्तकनगरात आढळले असून पती पत्नीला ही लागण झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या १२ झाली आहे.

ठाण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णांच्या संख्येत दिवसाला वाढ होतांना दिसत आहे. कळव्यातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना त्याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. हे दोघे १८ मार्च रोजी ब्रिटनवरून आले होते.

२१ मार्च रोजी त्यांना त्रास होऊ लागला होता. २३ मार्च रोजी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता वर्तकनगर भागातील अन्य एका दामप्त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दामप्त्य १५ मार्च रोजी अमेरिकेवरून आले होते. २१ मार्च रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. त्यानंतर आता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिह आला आहे.

संशयितांवर जीपीएसचा वॉच

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका केव्हीगार्ड अ‍ॅपच्या सहाय्याने होम कॉरन्टाइन केलेल्यांवर नजर ठेवणार आहे. आता ज्यांना होम कॉरन्टाइन केले आहे, त्यांच्यावर जीपीएसद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

Web Title: Corona patients in Thane at 12; Increase of two patients again in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.