पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच शहरात कोरोना फोफावला, स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:03 PM2020-05-20T20:03:06+5:302020-05-20T20:04:24+5:30

शहरात वाढत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येवरुन आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार आगपाखड केली. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच कोरोनाचे संकट झोपडपटटी भागात आणखी गडद होत असल्याचा आरोपही यावेळी सदस्यांनी केला

Corona rioted in the city due to unplanned management of the municipality, all party corporators fired at the administration in the standing committee meeting. | पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच शहरात कोरोना फोफावला, स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच शहरात कोरोना फोफावला, स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड

Next

ठाणे : झोपडपटटी भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या हायरीस्कमधील आणि लो रिस्कमधील नागरीकांना तत्काळ क्वॉरान्टाइन करण्यात अपयश, सार्वजनिक शौचालयांची सफाई दिवसातून तीन वेळा होणे अपेक्षित असतांना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे, रुग्णांची तपासणी करुन त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, एखादा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील नागरीकांना ठेवण्यासाठी महापालिकेकडे जागा नाही, ताप आलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत नाहीत, असे अनेक ठपके ठेवत स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराची चिरफाड केली. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच झोपडपटटीत कोरोना फोफावला असल्याचा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला.
                       ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बुधवारी दुपारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या कोरोनाच्या काळातील कमी पडलेल्या उपाय योजनांची चांगलीच चिरफाड केली. ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात कोरोनाच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. झोपडपटटी भागात तर कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे, लोकमान्य नगर, मुंब्रा, माजिवडा मानपाडा, वागळे इस्टेट, कळव्यातील झोपडपटटी या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावरुनच सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. झोपडपटटी भागात एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरीस्क आणि लो रिस्कमधील सर्वांना तत्काळ क्वॉरान्टाइन करणे अपेक्षित असते, मात्र तसे होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य हणमंत जगदाळे यांनी केला. त्यांना ठेवण्यासाठी पुरसे क्वॉरान्टइन केंद्रेही कमी असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपटटी भागात सार्वजनिक शौचालये हा कोरोना वाढीचे कारण असू शकते, परंतु त्याठिकाणी दिवसातून तीन वेळा सफाई होणे अपेक्षित असताना त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ताप आलेल्या रुग्णांवर देखील पालिकेच्या कळवा रुग्णालयात उपचार होत नसल्याची धक्कादायक बाब त्यांनी यावेळी उघडकीस आणली. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेल्या लुटीच्या विरोधात संजय भोईर यांनी आवाज उठवत, सर्वसामान्य रुग्ण या रुग्णालयात गेला तर त्याला आधी ५० हजार ते १ लाख डिपॉझीट करायला सांगितले जाते हे कधी थांबणार, पीपीई कीटचे आधीच नियोजन, हॉस्पीटलचे नियोजन आधी करणे अपेक्षित होते. मात्र त्यातही पालिका कमी पडली आहे. फायलेरीया विभागातील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणुक सुरु आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोरोनाच्या या काळात डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार आदींसह इतर महत्वाचे शासकीय कर्मचारी काम करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी ५० लाखांचा आरोग्य विमा काढण्याची मागणी सदस्य कृष्णा पाटील यांनी केली. दरम्यान दुपारी १ वाजता सुरु झालेल्या स्थायी समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. त्यामुळे प्रशासन आता याबाबत काय उत्तर देणार याची उत्कंठा मात्र शिगेला गेली आहे.

.

Web Title: Corona rioted in the city due to unplanned management of the municipality, all party corporators fired at the administration in the standing committee meeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.