बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:23+5:302021-04-24T04:41:23+5:30
मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व पालिकेने आता नाक्यानाक्यावर चाचणी सुरू केली आहे. शहरात कोरोना ...
मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व पालिकेने आता नाक्यानाक्यावर चाचणी सुरू केली आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे बेजबाबदार नागरिक, व्यावसायिक निर्बंध असूनही मोकाट फिरत आहेत. त्यातच अनेक नागरिक, फेरीवाले व व्यावसायिक मास्क घालत नाहीत किंवा मास्क अर्धवट घालतात. पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नागरिकांच्या मुक्त संचारावर आळा घालण्यासाठी तपासणी सुरू केली आहे. त्यातच या नागरिकांना पोलीस नाक्यांवर सुरू केलेल्या पालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात नेऊन त्यांची कोरोना चाचणी करायला लावत आहेत. अहवालात कोरोना पॉझिटिव्ह येताच त्या व्यक्तीला थेट अलगीकरण किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. पोलीस पकडून कोरोना चाचणी करायला लावत असल्याने आणि पॉझिटिव्ह आल्यास थेट अलगीकरण किंवा रुग्णालयात पाठवले जाणार असल्याने बेशिस्त व बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.