ठाणे जिल्ह्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 05:12 AM2020-11-22T05:12:34+5:302020-11-22T05:13:10+5:30
दिवसभरात सापडले ७१० रुग्ण
ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७१० रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख २२ हजार ९१२ बाधित रुग्ण झाले असून दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ५९२ झाली आहे. यामुळे कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यात १९६ रुग्ण आढळले असून शहरात आता ४९ हजार ७६९ रुग्ण नोंदले गेले आहेत, तर तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार २१२ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत १४९ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात ५२ हजार ५३३ बाधित झाले असून एक हजार ४० मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये २१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही.भिवंडीला १६ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ४४ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरला ४२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित सात हजार ७९९ झाले आहेत. या शहरात मृत्यू न झाल्यामुळे ९८ मृत्यू कायम आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५४ रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. येथील १७ हजार ७३७ बाधितांसह ५५९ मृतांची नोंदणी झाली आहे.
रायगड जिल्ह्यात ८५ रुग्णांची नोंद
रायगड : जिल्ह्यात शनिवारी ८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ५६ हजार ०७१ वर पोचली आहे. आतार्पयत एकूण १५९३ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, आतार्पयत ५३ हजार५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
नवी मुंबईत
१६९ रुग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात शनिवारी दिवसभरात १६९ रुग्ण वाढले असून ९१ बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४६,९५६ झाली असून त्यापैकी ४४,६५९ जण बरे झाले आहेत. शिल्लक रुग्णांची संख्या १,३४० वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे.
वसई-विरारमध्ये
५२ नवे रुग्ण
वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात ५२ रुग्ण नव्याने आढळून आले असून ४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर अजूनही ४३४ रुग्ण उपचार घेत आहेत.