Corona Vaccination : ठाण्यात विशेष आस्थापनांना लसींचे वाटप करण्यास महापौरांचा नकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:40 PM2021-05-18T19:40:22+5:302021-05-18T19:42:52+5:30

Corona Vaccination : काही विशेष आस्थापना आपणांकडे लसीकरण मोहिम सुरू करणोबाबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु आपण कोणत्याही विशेष आस्थापनांसाठी किंवा वर्गासाठी लस राखीव न ठेवता लसीकरण खुले ठेवलेले आहे.

Corona Vaccination: Mayor refuses to distribute vaccines to special establishments | Corona Vaccination : ठाण्यात विशेष आस्थापनांना लसींचे वाटप करण्यास महापौरांचा नकार!

Corona Vaccination : ठाण्यात विशेष आस्थापनांना लसींचे वाटप करण्यास महापौरांचा नकार!

Next
ठळक मुद्देठाणे महापालिकेकडून सध्या योग्य प्रकारे लसीकरण होत आहे. नियोजनामुळे आतापर्यत सव्वा तीन लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण केलेले आहे.

ठाणे  : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या योग्य पद्धतीने लसीकरण सुरु आहे. परंतु काही विशेष खाजगी आस्थापनांनी ठाणे महापालिकेकडे लसींची मागणी केलेली आहे. परंतु त्यांना पुरवठा केल्यास आपल्याकडील लसींचा साठा कमी होऊन त्याचा परिणाम केंद्रावर गर्दी होण्यात होणार आहे. तसेच, नागरीकांचा उद्रेक देखील होणार आहे. त्यामुळे विशेष खाजगी आस्थापनांना लसींचा साठा देऊ नये अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Corona Vaccination: Mayor refuses to distribute vaccines to special establishments)

ठाणे महापालिकेकडून सध्या योग्य प्रकारे लसीकरण होत आहे. नियोजनामुळे आतापर्यत सव्वा तीन लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण केलेले आहे. तसेच अजूनही लसींचा पुरवठा हा आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने लसीकरण राबवित आहात, ते अतिशय योग्य असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, काही विशेष आस्थापना आपणांकडे लसीकरण मोहिम सुरू करणोबाबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु आपण कोणत्याही विशेष आस्थापनांसाठी किंवा वर्गासाठी लस राखीव न ठेवता लसीकरण खुले ठेवलेले आहे. सद्यस्थितीत आपल्याकडेच लसींचा पुरवठा हा कमी प्रमाणात होत असून त्याप्रमाणो आपण नियोजन करुन सर्व लसीकरण केंद्रे सुरू ठेवली आहेत. 

सध्या ज्या ज्या केंद्रावर लसीकरण सुरू आहे, तेथे ज्याप्रमाणात लसींचा पुरवठा होतो त्याच्या दुप्पट संख्येने नागरिक हे पहाटे पाच वाजल्यापासून रांगेत उभे असतात. अशा परिस्थितीत आपल्याला प्राप्त होणाऱ्या लसींच्या साठ्यापैकी काही लसी जर विशेष आस्थापनांना उपलब्ध करु न दिल्या तर आपल्या लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा कमी होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

त्यामुळे महापालिकेला जो लसींचा साठा प्राप्त होत आहे, त्यातून विशेष आस्थापनांना लसीकरण करु नये असे म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. ज्या विशेष आस्थापनांनी महापालिकेकडे मागणी केली आहे, त्यांनी खाजगी रुग्णालयांकडे लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून लसीकरण करुन घ्यावे असेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Corona Vaccination: Mayor refuses to distribute vaccines to special establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.