corona virus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या घटली; दिवसभरात अवघ्या पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:08 PM2021-01-12T21:08:13+5:302021-01-12T21:09:57+5:30
ठाणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मंगळवारी ३५५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४७ हजार ७५७ रुग्ण संख्या झाली आहे.
ठाणे - जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मंगळवारी ३५५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४७ हजार ७५७ रुग्ण संख्या झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज मृतांची संख्या कमालीची घटली आहे. दिवसभरा अवघ्या पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३८ झाली आहे.
ठाणे परिसरात १०३ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आता ५६ हजार ८७० बाधीत झाले. अवघे तीन मृत्यू झाल्यामुळे शहरातील मृतांची संख्या एक हजार ३३४ झाली. कल्याण - डोंबिवलीत ९८ रुग्णांची वाढ होऊन या शहरात आता ५८ हजार ६७१ बाधीत झाले आहे. तर एक हजार ११८ मृत्यू कायम आहेत.
उल्हासनगरला ११ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ४७२ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३६३ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला सहा बधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६५० झाले असून मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १९ रुग्णांची नोंद असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात २५ हजार ८४० बाधितांसह ७९१ मृतांची नोंद आहे.
अंबरनाथमध्ये १२ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एक मृत्यू आहे. येथे बाधितांची संख्या आठ हजार ४१९ झाली असून ३०८ मृत्यू नोंदले आहेत. बदलापूरला २१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे नऊ हजार ६६ बाधीत झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२० आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३२ मृतांची नोंद झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार ९२८ झाले असून मृत्यू ५८२ झाले आहेत.