Corona Virus News: कोरोनामुळे ठाणे पोलीस दलातील जमादार सुखदेव पाटील यांचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:52 PM2021-04-27T21:52:40+5:302021-04-27T22:13:31+5:30
कोरोनाची बाधा झाल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुखदेव पाटील (५७) यांचा मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. त्यांच्या मागे पत्नी ज्योती (५५) तसेच मुलगा अनुराग आणि मुलगी (दोन्ही मुले विवाहित) असा परिवार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाची बाधा झाल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुखदेव पाटील (५७) यांचा मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कोरोनामुळे ३६ पोलीस शहीद झाले असून यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पाटील यांना १० एप्रिल २०२१ रोजी घसा खवखवणे, ताप आणि सर्दी चा त्रास झाल्याने त्यांची कोविडची तपासणी केली होती. ती १२ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आली. सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांनी घरी काही दिवस उपचार केले. अधिक त्रास झाल्यामुळे त्यांना १७ एप्रिल रोजी वर्तकनगर येथील लाईफकेअर हॉस्पीटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतांनाच २७ एप्रिल रोजी सकाळी त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉ. राजेश विश्वकर्मा यांनी सांगितले. पाटील हे ठाणे शहर पोलीस दलात १९ नोव्हेंबर १९८३ रोजी भरती झाले होते. ते १० जून २०१० पासून वर्तकनगर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि उपायुक्त विनय राठोड यांच्यासह वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, संतोष घाटेकर तसेच कर्मचाऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
* आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २७० अधिकारी आणि एक हजार ९९६ अंमलदार कोरोनामुळे बाधित झाले. यामध्ये दोन अधिकाºयांसह २६ पोलिसांचा मृत्यु झाला आहे.
* एक महिन्यांनी होणार होते निवृत्त पाटील हे ३८ वर्षांच्या पोलीस सेवेनंतर पुढील महिन्यातच ३१ मे २०२१ रोजी निवृत्त होणार होते. त्यांच्या मागे पत्नी ज्योती (५५) तसेच मुलगा अनुराग आणि मुलगी (दोन्ही मुले विवाहित) असा परिवार आहे.