CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ९०७ रुग्ण आढळले; ५१ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:23 PM2021-05-23T21:23:11+5:302021-05-23T21:24:11+5:30

Corona virus in Thane, kalyan, Dombivli: ठाणे शहरात १९९ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्णांची संख्या आता एक लाख २७ हजार ८८० तर मृतांची संख्या एक हजार ८५६ झाली आहे.

Corona virus in Thane: 907 patients found in Thane district; 51 death | CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ९०७ रुग्ण आढळले; ५१ जणांचा मृत्यू 

CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ९०७ रुग्ण आढळले; ५१ जणांचा मृत्यू 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत रविवारी ९०७ रुग्णांची वाढ झाली असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे‌. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता पाच लाख नऊ हजार ७६७ झाली आहे, तर मृतांची संख्या आठ हजार ८७१ नोंदली आहे. (Corona Virus new patient in thane today)

      ठाणे शहरात १९९ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्णांची संख्या आता एक लाख २७ हजार ८८० तर मृतांची संख्या एक हजार ८५६ झाली आहे. कल्याण डोंबिवलीला २१० नव्याने वाढ होऊन २४ जणांचा आज मृत्यू झाला. या मनपा क्षेत्रात एक लाख ३१ हजार ६७६ रुग्णांस एक हजार ८५६ मृतांची नोंद झाली आहे.

        उल्हासनगरमध्ये २२ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरात आजपर्यंत २० हजार ८० रुग्णांची व ४६४ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत २२ रुग्णांची वाढ व दोन मृत्यू झाला. आतापर्यंत या शहरातल्या १० हजार ३६८ रुग्णांची आणि ४३१ मृत्यू नोंदले गेले आहेत. मीरा भाईंदर शहरातही १३४ रुग्णांच्या वाढीसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ४८ हजार ७४ रुग्णांची व एक हजार २४३ मृत्यूची नोंद झाली आहे.

     अंबरनाथ शहरात १८ रुग्ण वाढ होऊन दोन मृत्यू झाले आहे. या शहरातील आतापर्यंत १९ हजार १०८ रुग्ण संख्येसह ४०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूर परिसरात ३६ बाधीत व एकही मृत्यू नाही. आतापर्यंत २० हजार ३५२ बाधीत व २३३ मृत्यू या शहरात झाले. जिल्ह्यातील गांवपाड्यात १३४ बाधीत आढळले असून आठ मृत्यू झाले आहेत. यामुळे आजपर्यंत येथील ३४ हजार ९९२ बाधीत व ८४६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus in Thane: 907 patients found in Thane district; 51 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.