कोरोनाचा उपचार हवाय, मग बिल भरावे लागेल, उपचाराचे दरपत्रकच जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:55 PM2020-05-19T18:55:01+5:302020-05-19T19:10:10+5:30

कोरोना बाधित व संशयित रुग्णाला भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे ठेवले जाईल. रुग्ण पॉङिाटीव्ह आढळला तर पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्डधारक रुग्ण वगळून इतर रुग्णांना पॉझिटीव्हचा अहवाल आल्यापासून प्रतिदिन ५०० रुपये आकारले जातात.

Corona wants treatment, then pay the bill, announce the rate of treatment KDMC MMG | कोरोनाचा उपचार हवाय, मग बिल भरावे लागेल, उपचाराचे दरपत्रकच जाहीर

कोरोनाचा उपचार हवाय, मग बिल भरावे लागेल, उपचाराचे दरपत्रकच जाहीर

Next

कल्याण-तुम्हाला कोरोना झाला आहे, तुम्ही महापालिकेच्या अथवा महापालिकेने कोरोना उपचारासाठी अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असाल तर त्याचे बिल कोरोना रुग्णाला भरावे लागणार आहे. हे बिल कशा प्रकारे आकारले जाईल. त्याचे दर पत्रकच कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहिर केले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या रुग्णाला आता मोफत उपचार मिळण्याची आशा मावळली आहे. सर्व  पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या कोरोना रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, पिवळे व केशरी रेशन रंगाच्या कार्डधारकांव्यतिरिक्त उपचार घेत असलेल्या अन्य कोरोना रुग्णांचा खिसा खाली होणार आहे.

कोरोना बाधित व संशयित रुग्णाला भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे ठेवले जाईल. रुग्ण पॉङिाटीव्ह आढळला तर पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्डधारक रुग्ण वगळून इतर रुग्णांना पॉझिटीव्हचा अहवाल आल्यापासून प्रतिदिन 500 रुपये आकारले जातील. त्यात भोजन, वास्तव्य आणि औषध उपचाराचा खर्च समाविष्ट असेल. टाटा आमंत्र येथील रुग्णाला पुढील उपचारासाठी पाठविण्याची वेळ आल्यास त्यापैकी पिवळे व केशरी रंगाचे रेशनकार्डधारक रुग्णांना प्राधान्याने महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील कोविड रुग्णालयात दाखल करावे. त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यास त्याला कल्याण पश्चिमेतील होलिक्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात यावे. त्याच्या उपचाराच्या खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेतून वर्ग रुग्णालयास वर्ग करण्यात येईल. पिवळे व केशरी रंगाचे रेशनकार्ड धारक रुग्ण वगळता अन्य रुग्ण हे नियॉन व आर. आर. रग्णालयात उपचारासाठी पाठविले जातील. त्याठिकाणी जागा उपलब्ध नसल्यास त्यांना होलिक्रासमध्ये दाखल केले जाईल. पिवळे व केशरी रंगाचे रुग्ण वगळता अन्य रुग्णांच्या उपचाराकरीता वेगळे दर आकारले जाणार आहे.

काय असतील प्रतिदिन दर

1. जनरल वार्ड-2800 रुपये.
2.शेअर रुम -3200 रुपये.
3. सिंगल रुम-3800 रुपये
4.अतिदक्षता विभाग-5000 रुपये
5.व्हेटींलेटर-2000 रुपये

या दरात डॉक्टर व्हीजीट, नर्सिग, पीपीई किट, जेवणाचा खर्च समाविष्ट असेल. नमूद दरा व्यतिरिक्त प्रत्यक्षात वापरात असलेल्या औषधे, सर्जिकल साहित्य, लॅबच्या तपासण्याचा अतिरिक्त खर्च आकारला जाईल. त्यामध्ये 15 टक्के सूट असेल. ज्या रुग्णांचा वैद्यकीय विमा असेल त्यांची पूर्तता रुग्णांलयांनी नेहमीच्या पद्धतीची अवलंब करायचा आहे.  सरकारकडून अन्य दर निश्चित केल्यास ते देखील लागू केली जातील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. टाटा आमंत्रचे कामकाजाकरीता  उपअभियंता प्रमोद मोरे व महात्मा फुले योजनेतील रुग्णांकरीता  वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर हे काम पाहणार आहे.

Web Title: Corona wants treatment, then pay the bill, announce the rate of treatment KDMC MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.