कोरोनाचे नवे ५९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:06+5:302021-08-21T04:45:06+5:30

--------- रॉडने मारहाण कल्याण : पूर्वेतील आनंदवाडी परिसरात राहणारा रोशन शर्मा (१८) हा बुधवारी रात्री ८.३० वाजता घराजवळील किराणा ...

Corona's 59 new patients | कोरोनाचे नवे ५९ रुग्ण

कोरोनाचे नवे ५९ रुग्ण

Next

---------

रॉडने मारहाण

कल्याण : पूर्वेतील आनंदवाडी परिसरात राहणारा रोशन शर्मा (१८) हा बुधवारी रात्री ८.३० वाजता घराजवळील किराणा मालाच्या दुकानात सामान घेण्यासाठी गेला होता. तो तेथून परतत असताना मदराजा आणि संत्या या दोघांनी मागील भांडणाचा रागातून रोशन याला शिवीगाळ केली. याबाबत त्याने जाब विचारला असता दोघांनी लोखंडी रॉडने रोशन याच्या डोक्यात प्रहार करून त्याला जखमी केले. याप्रकरणी रोशनच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------------------------

रिक्षा चोरीला

डोंबिवली : दिलीप चौधरी यांची रिक्षा चोरीला गेल्याची घटना पूर्वेतील गोळवली भागातील ते राहत असलेल्या एकविरा बिल्डिंगसमोर मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी चौधरी यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------

घरफोडीत २५ हजारांचे मोबाइल चोरीला

डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा रोडवरील लक्ष्मीनगर झोपडपट्टीच्या परिसरात राहणारे राकेश चव्हाण यांच्या घराची खिडकी उघडून चोरट्यांनी घरातील एकूण २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------

नेत्ररोग तपासणी शिबिर

डोंबिवली : मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकारी तकदीर काळण आणि गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट यांनी गुरुवारी महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व नेत्ररोग मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत हेदुटणे येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळेत झालेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

---------------------------------------

Web Title: Corona's 59 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.