ठाण्यात कोरोनाचा हाहाकार; एक हजार 484 बधीतांसह 44 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:09 PM2020-06-30T23:09:15+5:302020-06-30T23:09:35+5:30
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 462 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे : कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या एक हजार 484 तर, 44 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 33 हजार 324 तर, मृतांची संख्या 1 हजार 46 झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 462 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 575 तर, मृतांची संख्या 120 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 266 बाधितांची तर, 15 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 772 तर, मृतांची संख्या 326 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 178 रुग्णांची तर, चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 605 तर, मृतांची संख्या 211 वर पोहोचला आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात 82 बधीतांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 941 तर, मृतांची संख्या 109 वर पोहोचली. त्यात मीरा भाईंदरमध्ये 161 रुग्णांसह 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 326 तर, मृतांची संख्या 145 इतकी झाली आहे.
उल्हासनगर 148 रुग्णांची तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एका हजार 914 तर, मृतांची संख्या 46 झाली आहे. अंबरनाथमध्ये 54 रुग्णांची तर, तीघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 823 तर, मृतांची संख्या 45 झाली आहे. बदलापूरमध्ये 32 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 774 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 101 रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 594 तर, मृतांची संख्या 47 वर गेली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.