Coronavaccine: लसीकरण लांबल्यामुळे लाखो तरुणांची निराशा; लसींचा तुटवडा, १ मेचा मुहूर्त हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:34 PM2021-04-29T23:34:02+5:302021-04-29T23:34:14+5:30

लसींचा तुटवडा : १ मेचा मुहूर्त हुकणार

Coronavaccine: Millions of young people frustrated by delayed vaccinations | Coronavaccine: लसीकरण लांबल्यामुळे लाखो तरुणांची निराशा; लसींचा तुटवडा, १ मेचा मुहूर्त हुकणार

Coronavaccine: लसीकरण लांबल्यामुळे लाखो तरुणांची निराशा; लसींचा तुटवडा, १ मेचा मुहूर्त हुकणार

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून त्यावर मात करण्यासाठी १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार होती. पण, लस तुटवड्याअभावी काही दिवसांसाठी हा मुहूर्त टाळण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील १८ ते ४४ या वयोगटातील तब्बल ४३ लाख ६३ हजार ९८ तरुणांची निराशा झाली आहे.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढायला लागली. त्यापासून बचाव करण्यासह कोरोनामुक्त राहण्यासाठी सध्याची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून राज्य शासनाने १ मे या ‘महाराष्ट्र दिनी’ १८ वर्षांवरील युवा, युवतींचे लसीकरण करण्याचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र, ही प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात सध्या उपलब्ध नसल्याने हा लसीकरणाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील नवतरुण, तरुणींच्या लसीकरणाचे वेळापत्रक आता काही दिवसांसाठी तरी कोलमडले आहे.

या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी वापरण्यात येत आहेत. या लसींपैकी जिल्ह्यात प्रारंभापासून आतापर्यंत कोविशिल्डला सर्वाधिक १० लाख ५२ हजार ७१८ जणांनी पसंती दिली आहे.  याखालोखाल कोव्हॅक्सिनचे अवघ्या १ लाख २ हजार ६८४ जणांना डोस देण्यात आले आहेत. आजपर्यंत झालेल्या ११ लाख ५५ हजार ४०२ लोकांच्या लसीकरणापाठोपाठ जिल्ह्यातील ४३ लाख ६३ लाख ९८ जणांच्या लसीकरणास शनिवारपासून प्रारंभ होणार होता. तो आता काही दिवस लांबला आहे. 

या १० लाख ८६ हजार तरुणांसह ३९ वर्षांच्या १५ लाख ९२ हजार ३६ तरुणांसह ४४ वर्षापर्यंतच्या १६ लाख ८५ हजार ३१ जणांचे लसीकरण आता लांबणीवर पडलेले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांना आता प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याशिवाय पर्याय नाही.
 

Web Title: Coronavaccine: Millions of young people frustrated by delayed vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.