Coronavirus : लसीचा साठा न आल्याने मीरा-भाईंदर पालिकेची १० लसीकरण केंद्र बंद तर केवळ २ केंद्रच सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:12 PM2021-05-03T23:12:19+5:302021-05-03T23:13:34+5:30
Corona Vaccination : मीरा भाईंदर महापालिके कडे दुसऱ्या डोस साठीच्या ४ हजार ४४० लस शिल्लक आहे . त्यात कोवॅक्सीनचे २१८० व कोविशील्डच्या २२६० लसी आहेत . ह्या लसी ४५ वर्ष वरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोस साठी लागणार आहेत .
मीरारोड - लसीचा पुरवठा न झाल्याने मीरा भाईंदर महापालिकेला त्यांची १० लसीकरण केंद्र सोमवारी बंद करावी लागली आहेत . दोन लसीकरण केंद्रांवरच लस दिली जात असल्याने नागरिकांची उसळून वाद व नाराजीचे प्रकार वाढले आहेत .
मीरा भाईंदर महापालिके कडे दुसऱ्या डोस साठीच्या ४ हजार ४४० लस शिल्लक आहे . त्यात कोवॅक्सीनचे २१८० व कोविशील्डच्या २२६० लसी आहेत . ह्या लसी ४५ वर्ष वरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोस साठी लागणार आहेत . जेणे करून पालिकेने लस येई पर्यंत भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालय व मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रच सोमवारी सुरु ठेवली होती . बाकी १० लसीकरण केंद्र बंद करावी लागली .
सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्रातच लस दिली जात आहे . त्यासाठी १८१० इतका लस साठा शिल्लक असल्याने मंगळवारी केवळ ४०० लसीच दिल्या जाणार आहेत . ह्या गटातील नागरिकांसाठी एकच केंद्र असल्याने जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे . ऑनलाईन नोंदणी व डोसची तारीख मिळाल्या शिवाय कोणी येऊ नये असे आवाहन करून सुद्धा गर्दी होत असून त्यात वाद व नाराजीचे प्रकार होत आहेत .
इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सुद्धा मंगळवारी फक्त दुसरा डोस ची तारखा असणाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे . मंगळवारी लसीचा पुरवठा होईल अशी पालिका अधिकाऱ्यांना आशा असून लस मिळताच अन्य केंद्र सुरु केली जातील असे सांगण्यात येत आहे . परंतु शहरातील जवळपास सर्वच लसीकरण केंद्र बंद असल्याने लोकां मध्ये नाराजी असून अनेकांनी केंद्रावर गर्दी केली होती .