CoronaVirus News: कोरोनाला १0५ गावांनी वेशीवरच रोखले!; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:13 AM2020-08-14T01:13:39+5:302020-08-14T01:13:48+5:30

२0९ ग्रामपंचायती एक महिन्यापासून कोरोनामुक्त, घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यावर भर

CoronaVirus 105 villages in thane does not have even single corona patient | CoronaVirus News: कोरोनाला १0५ गावांनी वेशीवरच रोखले!; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0 टक्के

CoronaVirus News: कोरोनाला १0५ गावांनी वेशीवरच रोखले!; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0 टक्के

Next

- सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्हा परिषदेच्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गुरवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्याच दिवशी मुरबाड आणि त्यानंतर भिवंडी तालुक्यांतील बोरिवली येथे रुग्ण आढळला. मात्र, जिल्ह्यातील १0५ ग्रामपंचायती व त्यातील गावपाड्यांनी आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. एवढेच नव्हे, तर ४३0 ग्रामपंचायतींपैकी २0९ ग्रामपंचायती एक महिन्यापासून कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0 टक्क्यांवर पोहोचले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत सात हजार ६८२ रुग्ण आढळून आले. त्यापैकी आतापर्यंत सहा हजार १७९ रुग्ण बरे (८0 टक्के) झाले. जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात २२७ जणांचा मृत्यू (२.९५ टक्के) झाला आहे. जिल्ह्यात एक हजार १२७ प्रतिबंधात्मक क्षेत्र असून, सध्या केवळ ३४५ प्रतिबंधात्मक क्षेत्र सुरू आहेत. जिल्ह्यातील ७८२ प्रतिबंधात्मक क्षेत्रातील कुटुंबांना गृहभेटी देऊन त्यांचे ६९ टक्के आरोग्य सर्वेक्षण केले आहे. आजपर्यंत तीन लाख ७0 हजार ७७३ जणांचे आरोग्य सर्वेक्षण करून त्यांना कोरोना नसल्याची खात्री केली आहे. सर्दी, खोकला, ताप, डोके दुखणे आदी आजार आहे की कसे, आदींची या सर्वेक्षणात पाहणी केल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

वासिंद, अघई, शेंद्रूण, टेंभा या शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायती हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत. याप्रमाणेच मुरबाडच्या म्हसा, सरळगावचाही समावेश आहे. कल्याणमधील निळजे, दहागाव या ग्रामपंचायतीही हॉटस्पॉट आहेत. भिवंडी तालुक्यातील खारबाव, कोन, दिवा-अंजूर, अनगाव आणि अंबरनाथच्या बदलापूर आणि वांगणी आदी ठिकाणांना हॉटस्पॉट घोषित केले आहेत. या कालावधीत ग्रामीण हायरिक्स म्हणजे अतिजोखमीचे २१ हजार ४२0 रुग्ण, तर कमी जोखमीचे ११ हजार १00 अशा ३२ हजार ५२0 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासाठी १५ हजार ७१४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागले. यामधील पाच हजार ९४७ जणांचे संस्थात्मक कक्षात विलगीकरण केले होते. यासाठी भिवंडीला टाटा आमंत्रात १७२ बेड, सोनवळीला ३0 आणि अंबरनाथला ३0 बेड राखीव आहेत. मुरबाडला कुडवली येथे १० बेड, शहापूरला जोंधळे कॉलेजला १00 बेड राखीव आहेत.

कोरोनामुक्त गावे
कानविंदे, कळमगाव, कुकाबे, साजिवली, सापगाव या शहापूर तालुक्यातील आदिवासी गावांसह कल्याण तालुक्यातील उशीद गावात एकही रु ग्ण नाही. मुरबाड तालुक्यातील म्हसा, तुळई, धसई, शिवळे, देवपे या गावांसह भिवंडीतील ब्राह्मणगाव आणि दुधणी ही गावे कोरोनामुक्त आहेत.

आरोग्य केंद्र-उपकेंद्रांकडून शुश्रूषा
जिल्ह्यात ३३ आरोग्य केंद्रे आहेत. आतापर्यंत नऊ हजार ५६७ जणांना घरी, तर पाच हजार ९४७ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. या १५ हजार ७१४ जणांवर आरोग्य यंत्रणेने अतिशय जोखमीच्या काळातही बारकाईने लक्ष ठेवून त्यांची काळजी घेतली आहे.

घरोघरी भेट देऊन आॅक्सिजनतपासणी
जिल्ह्यातील ८0९ गावे, पाडे आणि दुर्गम भागांत अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि आशावर्कर घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याची स्क्र ीन टेस्टिंग आणि आॅक्सिजनतपासणी करत आहेत. गृहभेटीद्वारे तीन लाख ७0 हजार ७७३ जणांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे.

नेमके
काय केले?
सुरुवातीच्या काळातच गावकऱ्यांनी बाहेरील भाजीपाल्यासह इतर वस्तूही घेण्यास प्रतिबंध केला.
बाहेरगावचे नातेवाईक व इतर पाहुण्यांनादेखील कोणत्याही कामासाठी गावात न येण्याची विनंती केली.
गावातून बाहेर गेलेली व्यक्ती घरी आल्यावर घराबाहेरच अंघोळ करते. तिचे कपडेही बाहेरच ठेवले जातात.
बाहेर जाताना तोंडाला मास्क किंवा रु माल बांधण्याचा नियम गावकरी कटाक्षाने पाळतात.
बियाणे, खतखरेदीसाठी प्रत्येकाने बाहेर पडण्याऐवजी चारपाच शेतकरी मिळून ही खरेदी करण्यात आली.
बियाणे, खते अथवा बाहेरून आणलेली कोणतीही वस्तू दोन दिवस घराबाहेरच एकीकडे ठेवली जाते.
बाहेरची व्यक्ती घरी आलीच, तर तिने वापरलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाते.
अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय गावकरी गावाबाहेर पडलेच नाही.
गावातील लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची विशेषकरून काळजी घेण्यात आली.
शहरांशी कमी संपर्क आणि वैयक्तिक काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न.

२0९ ग्रा.पं. निर्धोक
ग्रामीण, दुर्गम भागात उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८0 टक्के आहे. मृत्युदर २.९५ टक्के आहे. १,१२७ प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ३,७0,७७३ जणांचे सर्वेक्षण केले आहे. ४३0 ग्रामपंचायतीपैकी २0९ ग्रामपंचायती व पाडे कोरोनामुक्त झाले आहेत. या गावपाड्यांमध्ये २८ दिवसांत एकही रु ग्ण आढळला नाही.
- हिरालाल सोनवणे,
सीईओ, जिल्हा परिषद

नियमित धूरफवारणी
देवपे येथे क्वारंटाइन सेंटर आहे. मात्र, गावात नियमित स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा आणि वेळोवेळी धूरफवारणी केल्याने गावात एकही रुग्ण नाही. प्रत्येक ग्रामस्थाला मास्क वापरण्याची सक्ती आहे.
- संगीता वडवले, सरपंच, देवपे

कडक गावबंदी
लॉकडाऊनदरम्यान कडक गावबंदी लागू केली. याशिवाय सामाजिक अंतर, मास्क वापरण्याचीही सक्ती केली. सतत हात धुणे तसेच गावातील स्वच्छता, औषधफवारणी या उपाययोजनांकडे लक्ष केंद्रित केले.
- प्रवीण भोईर, सरपंच, उशीद

अनोळखींना प्रवेशबंदी
गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रथम गावबंदी मोहीम राबवली. कुणाला बाहेर जावे लागलेच, तर त्याच्या प्रवासाची नोंद घेतली जात असे. गावात अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाकारला.
- प्रमोद शिंगोळे, सरपंच, दहीगाव

फेरीवाल्यांना मनाई
बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत साजिवली, कुकांबे व बारा पाडे आहेत. येथे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. बाहेरील फेरीवाल्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
- बाळू वेहळे, सरपंच, बिरवाडी

मोफत मास्कवाटप
कोरोनाचे संक्र मण होऊ नये म्हणून रस्ते प्रथम बंद केले. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी व्यापारीवर्गाला विश्वासात घेतले. वेळोवेळी धूरफवारणी
करून घरोघरी सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप केले.
- ताराबाई कथोरे, सरपंच, म्हसा

Web Title: CoronaVirus 105 villages in thane does not have even single corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.