coronavirus : कल्याण-डोंबिवलीत आढळले 11 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:07 PM2020-04-23T17:07:25+5:302020-04-23T17:13:18+5:30
आज महापालिका हद्दीत नवे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 108 झाली आहे.
कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. आज महापालिका हद्दीत नवे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 108 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कॅन्सर रुग्णासह धारावीतील शासकीय कर्मचारी व मुंबईतील रुग्णालयातील कर्मचा-याचा समावेश आहे.
मधूमेह व रक्तदाबाचा आजार असलेल्यांना कोरोनाची लागण लवकर होते. तसेच कॅन्सर रुग्णामध्ये प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुले त्यांनाही कोरोनाची लागण लवकर होते. महापालिका हद्दीत कल्याण पूव्रेत राहणा-या 42 वर्षीय कॅन्सर रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. धारावी येथे काम करणारा 53 वर्षीय शासकीय कर्मचारी हा कल्याण पूव्रेत राहतो. त्याला कोरोना झाला आहे. त्याचबरोबर मुंबईतील सरकरी रुग्णालयात काम करणा-या 33 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर ठाणे येथे सरकारी कर्मचारी असलेल्या 43 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. हे दोघेही कल्याण पूर्वेत राहतात.
डोंबिवली पश्चिमेतील 50 वर्षीय इसम आणि 22 व 23 वर्षीय तरुणासह कल्याण पश्चिमेतील 64 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला आणि 54 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आह. हे रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर मांडा टिटवाळा परिसरात 42 पुरुषाला कोरोना झाला आहे. या सगळ्य़ा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यत 33 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 72 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 12 नवे रुग्ण आढळून आले होते. आज 11 नवे रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुले कल्याण डोंबिवलीची चिंता वाढत आहे.