coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११६८ रुग्णांची नोंद; २८ जणांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 08:22 PM2020-10-06T20:22:44+5:302020-10-06T20:24:57+5:30

Thane News : ठाणे जिल्ह्यात एक हजार १६८ रुग्ण मंगळवारी नव्याने आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८३ हजार ९४२ रुग्ण बाधीत झाल्याची नोंद झाली आहे.

coronavirus: 1168 corona patients registered in Thane district; 28 Death | coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११६८ रुग्णांची नोंद; २८ जणांचे मृत्यू

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११६८ रुग्णांची नोंद; २८ जणांचे मृत्यू

Next

ठाणे - जिल्ह्यात एक हजार १६८ रुग्ण मंगळवारी नव्याने आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८३ हजार ९४२ रुग्ण बाधीत झाल्याची नोंद झाली आहे. तर, आज २८ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ६४४ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात आज ३१२ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ३८ हजार ९४४ रुग्णांची नोंद केली आहे. तर, सहा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या एक हजार ३५ नोंदवण्यात आली आहे. कल्याण-कल्याण महापालिका हद्दीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत मृतांची संख्या ८६४ झाली आहे. तर, आज नव्याने ३२८ रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्ण संख्या ४४ हजार ३९२ झाली आहे. उल्हासनगर शहरात ३० नवे रुग्ण आढळले आहेत. आता रुग्णाची संख्या नऊ हजार ४५६ झाली आहे. आज एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात १५ बाधीत आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच हजार २४५ बाधीत असून मृतांची संख्या ३१४ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १४६ रुग्णांची तर आज पाच मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात १९ हजार ५६५ बाधितांसह ६०३ मृत्यू झाले आहे. अंबरनाथमध्ये २२ रूग्ण सापडले असून आज एकाही मृताची नोंद नाही. आता बाधितांची संख्या सहा हजार ५५२ असून मृत्यू २३६ कायम आहेत. बदलापूरमध्ये ३५ रुग्णांचा नव्याने शोध लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ४८६ झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झाला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये १३ रुग्ण आज सापडले असून तीन मृत्यू झाले आहेत. या क्षेत्रात १४ हजार ५६७ बाधीत झाले असून मृतांची संख्या ४१७ वर गेली आहे.

Web Title: coronavirus: 1168 corona patients registered in Thane district; 28 Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.